BREAKING

✪ ✪ ✪➤ ✪➤ ✪➤ . ✪ ✪➤ ✪➤ . ✪➤

१० जून, २०२२

प्रवाशाने घेतले धावत्या बसमध्ये विष !

 


सोलापूर : प्रवाशांना घेऊन राज्य परिवहन महामंडळाची बस धावत असताना अचानक एका प्रवाशाने विष प्राशन केल्याने खळबळ उडाली आणि बस थेट सोलापूर सिव्हील हॉस्पिटलमध्ये पोहोचली. 


वेगवेगळ्या कारणांनी आत्महत्येच्या घटना वाढलेल्या आहेत आणि त्याच्या पद्धती देखील बदलत चालल्या आहेत . आत्महत्या करण्यासाठी निर्जन स्थळ शोधले जाते आणि आजूबाजूला कुणी नसताना असे प्रयत्न केले जातात. एकाने मात्र प्रवाशी घेवून निघालेल्या एस टी बस मध्येच विष प्राशन करून आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला असून बहुधा अशी घटना पहिल्यांदाच घडली असावी. धावत्या बसमधील प्रवाशाने विष प्राशन केल्याची घटना जेंव्हा उघडकीस आली तेंव्हा बसमधील प्रवाशांचा एकच गोंधळ उडाला.  एस टी बस सोलापूर, तुळजापूर मार्गाने उस्मानाबादकडे निघाली असता सोलापूर येथून ही बस पुढे निघताच हा प्रकार उघडकीस आला. 


सदर बसमध्ये सोलापूर बस स्थानकावर एक प्रवासी बसमध्ये चढला. तुळजापूर, उस्मानाबादकडे जाणारे अनेक प्रवासी या बसमधून प्रवास करीत होते. सोलापूर स्थानकावरून ही बस काहीशी पुढे गेली असता बसमधील एका प्रवाशाने धावत्या बसमध्ये विष घेतल्याची बाब लक्षात आली. वाहक आणि चालक यांच्या लक्षात ही बाब येताच त्यांनी प्रसंगावधान राखून बसचा मार्ग बदलला. तुळजापूरच्या दिशेने निघालेली ही बस सोलापूर येथील सिव्हील हॉस्पीटलकडे वळविण्यात आली आणि सदर प्रवाशाला रुग्णालयात दाखल करण्यात आले. अचानक घडलेल्या या प्रकाराने बसमधील प्रवासी गोंधळून गेले. (Poisoning by a passenger in a running bus) धावत्या बसमध्ये हा प्रकार घडल्याने अनेकजण थक्क होवून या घटनेकडे पहात होते. 


आणि लक्षात आले !

 सिद्धेश्वर गुरुराज स्वामी असे विष प्राशन केलेल्या प्रवाशाचे नाव आहे. सदर प्रवासी एस टी च्या मागच्या बाकावर बसलेला होता. त्याला जोराचा खोकला लागला आणि तो उलट्या करू लागला. याच दरम्यान विषारी औषधाचा उग्र वास येऊ लागला त्यामुळे या प्रवाशाने विष प्राशन केल्याची बाब लक्षात आली. सोलापूर स्थानकापासून केवळ दोन किमी अंतर ही बस गेली होती त्यामुळे तातडीने शासकीय रुग्णालयात पोहोचता आले  

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

आपल्या प्रतीसादाबद्धल धन्यवाद !