BREAKING

✪ ✪ ✪➤ ✪➤ ✪➤ . ✪ ✪➤ ✪➤ . ✪➤

१० जून, २०२२

आनंदवार्ता , अखेर मान्सून महाराष्ट्रात दाखल !




पुणे : लवकर येणार, वेळेआधी येणार म्हणून रेंगाळलेला मान्सून अखेर आज महाराष्ट्रात दाखल झाला असून मोसमी पावसाची अखेर प्रतीक्षा आज संपली आहे. 


यावर्षी वेळेपूर्वी मान्सून येणार आणि सर्वत्र भरपूर बरसणार असल्याचा अंदाज हवामान विभागाने अनेकदा व्यक्त केला होता त्यामुळे शेतकरी बांधवाला चांगलाच दिलासा मिळाला होता. अंदमानात आणि केरळमध्ये देखील वेळेच्या आधी मान्सून दाखल झाला पण तेथून पुढे महाराष्ट्रात येण्यापूर्वी तो रेंगाळला. कारवार, गोव्याच्या सीमेच्या आत मान्सून येण्यापुर्वीच त्याचा प्रवास रखडला आणि पुन्हा रोज नवे अंदाज येत राहिले. वेळेच्या आधीच येणार असलेला पाऊस ७ जूनलाही राज्यात आला नाही त्यामुळे शेतकऱ्यांचे डोळे पुन्हा आभाळाकडे लागले होते परंतु मान्सूनच्या प्रवासाला अनुकूल आणि पोषक वातावरण निर्माण झाल्याने पुढील ४८ तास मान्सून राज्यात दाखल होईल असा नवा अंदाज हवामान विभागाने दिला होता आणि त्याप्रमाणे आज मान्सूनचे राज्यात आगमन झाले आहे त्यामुळे आनंदाचे वातावरण निर्माण झाले आहे. 


मोठी वाट पाहायला लावलेला मान्सून आज महाराष्ट्रात दाखल झाला असल्याची माहिती भारतीय हवामान विभागाने आज अधिकृतपाने दिली आहे. कोकणात दोन दिवसांपासून ढगाळ हवामान होते आणि पावसाच्या सरी देखील येत होत्या. (Monsoon arrives in Maharashtra) त्यापाठोपाठ आज कोकणात मान्सून दाखल झाला असून पावसाला देखील सुरुवात झाली आहे.   



कोकणात मान्सून पोहोचला असला तरी राज्याच्या काही भागात काळापासून ढगाळ आणि पावसाळी वातावरण निर्माण झाले आहे. कालपासून राज्याच्या काही भागात पावसाच्या सरी कोसळत आहेत. पुणे परिसरात देखील आज आभाळात ढग दाटून आले असून त्यानंतर पावसाला सुरुवात झाली. अचानक आलेल्या पावसामुळे पुणे शहरात अनेकांची तारांबळ उडाली. 


जोरदार पाऊस होणार !

कोकणात आज मान्सून दाखल झाला असून आता तो राज्य व्यापून टाकणार आहे, कोकणासह पश्चिम महाराष्ट्रात काही भागात दोन दिवसात मुसळधार पाऊस होण्याची शक्यता असल्याचा अंदाज हवामान विभागाने व्यक्त केला आहे. मान्सून दाखल झाल्याने राज्यातील शेतकरी आनंदित झाले आहेत. 


कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

आपल्या प्रतीसादाबद्धल धन्यवाद !