BREAKING

✪ ✪ ✪➤ ✪➤ ✪➤ . ✪ ✪➤ ✪➤ . ✪➤

९ जून, २०२२

अर्ध्या तासात तीन ठिकाणी वीज कोसळली !

 



अकलूज : अकलूज - इंदापूर मार्गावर अर्ध्या तासाच्या कालावधीत तीन ठिकाणी वीज कोसळली परंतु सुदैवाने जीवितहानी झाली नाही. एकाच परिसरात तीन ठिकाणी वीज पडल्याने पावसाळ्याच्या दिवसात अधिक काळजी घेण्याची गरज निर्माण झाली आहे. 


पावसाळा सुरु होण्याच्या आधी पूर्व मोसमी पाऊस होतो त्यावेळी आकाशात विजांचा प्रचंड कडकडात होत असतो, ढगांचा गडगडात होत पावसाचे वातावरण होते. अशावेळी पाऊस होईलच असे सांगता येत नाही परंतु आकाशातून वीज कोसळण्याच्या घटना मात्र घडत असतात आणि यामुळे जीवित अथवा वित्त हानी होण्याची अधिक शक्यता असते. अलीकडेच इंदापूर तालुक्यात वीज कोसळल्याने अनेक शेळ्या मृत्युमुखी पडल्या होत्या. विजा कडाडत असताना आणि ढगांचा गडगडाट सुरु असताना शक्यतो बाहेर न पडणेच हिताचे असते. अकलूज - इंदापूर मार्गावर केवळ अर्ध्या तासात तीन ठिकाणी वीज कोसळल्याची घटना घडली आहे परंतु सुदैवाने यात काहीही नुकसान झाले नाही. 


अकलूज - इंदापूर रस्त्यावर बावडा येथे ढगांच्या गडगडाटासह पाउस सुरु झाला आणि  अर्धा तास मान्सूनपूर्व पावसाच्या सरी कोसळत राहिल्या.  रत्नप्रभादेवी नगर येथील एका घराच्या जवळच वीज कोसळली. ही वीज कोसळल्यामुळे नारळाची दोन झाडे जळून गेली आहेत. शहाजीनगर येथे वीज पडण्याची दुसरी घटना घडली असून येथे नारळाच्या झाडावरच वीज कोसळली आहे. तिसऱ्या घटनेत अकलूज - इंदापूर रस्त्यावरील राऊत वस्तीजवळ शिंदे यांच्या घराच्या जवळच  वीज कोसळली यामुळे एका लिंबाच्या झाडाचे नुकसान झाले आहे. (Lightning struck three times in half an hour)वीज कोसळण्याच्या या तीनही घटना केवळ अर्ध्या तासाभरात घडल्या आहेत. तीन घटना घडूनही काही दुर्घटना न घडल्याने परिसराला दिलासा मिळाला आहे.   



कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

आपल्या प्रतीसादाबद्धल धन्यवाद !