BREAKING

✪ ✪ ✪➤ ✪➤ ✪➤ . ✪ ✪➤ ✪➤ . ✪➤

४ मे, २०२२

विद्यार्थ्यांना पहिल्याच दिवशी मिळणार मोफत पुस्तके !

 


मुंबई : यावर्षी शाळा सुरु होताच पहिल्याच दिवशी विद्यार्थ्यांना मोफत पाठ्यपुस्तके दिली जाणार असल्याची माहिती आज शालेय शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांनी दिली. पुस्तके वितरणाचा प्रारंभ आज करण्यात आला. 


समग्र शिक्षा अभियानांतर्गत जिल्हा परिषद, नगरपालिका, महानगरपालिका, कटक मांडले आणि अनुदानित शाळांना राज्य शासनाच्या मार्फत पाठ्यपुस्तके मोफत दिली जातात. पहिली ते आठवी पर्यंतच्या विद्यार्थ्यांना शासनाच्या वतीने पाठ्यपुस्तकांचे मोफत वितरण करण्यात येते. शाळा सुरु होण्यापूर्वी पुस्तके पोहोचविण्याचे नियोजन करण्यात आले असून या वितरणाचा प्रारंभ आज शालेय शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांच्या हस्ते करण्यात आला. यावर्षी सर्वच विद्यार्थ्यांना वेळेत पुस्तके मिळणार आहेत  जून महिन्यापासून नियमित शाळा सुरु होत असून राज्यातील सर्वच विद्यार्थ्यांना शाळा सुरु होण्याच्या पहिल्याच दिवशी पाठ्यपुस्तके देण्याचे नियोजन करण्यात आले आहे. 


मुंबईत मोफत पुस्तकांच्या वितरणास सुरुवात करण्यात आली असून पाठ्यपुस्तक मंडळाच्या अन्य विभागीय भांडारातूनही मोफत पुस्तकांचे वितरण सुरु करण्यात आले आहे. शिक्षणिक वर्ष २०२२ - २३ साठी एकूण ५ कोटी ४० लाख प्रतींचा पुरवठा करण्यात येणार आहे. ही पुस्तके विद्यार्थ्यांना पहिल्याच दिवशी मिळावीत असे निर्देश देखील देण्यात आले आहेत समग्र शिक्षा अभियानाव्यतिरिक्त इयत्ता पहिली ते बारावी पर्यंतची पुस्तके खुल्या बाजारात विक्रीसाठी उपलब्ध करून देण्यात आलेली आहेत. 




कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

आपल्या प्रतीसादाबद्धल धन्यवाद !