BREAKING

✪ ✪ ✪➤ ✪➤ ✪➤ . ✪ ✪➤ ✪➤ . ✪➤

७ एप्रि, २०२२

पोलिसांनी पकडला तीन लाखाचा गुटख्याचा साठा !


 

मोहोळ : अवैध मार्गाने विक्री करण्यासाठी साठा करून ठेवलेला तीन लाख रुपये किमतींचा गुटखा मोहोळ पोलिसांनी पकडला असून या प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. 


गुटखा वाहतूक, विक्री आणि साठवण याला कायद्याने बंदी असली तरी सगळीकडे हा बेकायदा गुटखा असल्याचे दिसून येते. बंदी असलेला हा गुटखा तोंडात टाकणारे आणि तोबरा भरून पिचकाऱ्या मारणारे गुटखा शौकीन जागोजागी दिसतात. बेकायदेशीर रित्या वाहतूक केला जात असलेला लाखो रुपयांचा गुटखा पोलीस पकडतात तरीही त्यात कसलीही कमतरता दिसून येत नाही. अशाच प्रकारे बेकायादेशी विक्री करण्यासाठी साठवून ठेवलेला गुटखा मोहोळ पोलिसांच्या गुन्हे अन्वेषण पथकाने पकडला आहे. साठे नगर येथे गुटख्याचा साठा असल्याची माहिती पोलिसांना मिळाल्यानुसार पोलिसांनी जावून पाहणी केली असता तीन लाख बारा हजार रुपयांचा गुटखा आणि अन्य पान मसाल्याचा साठा असल्याचे पोलिसांना दिसून आले. 


मोहोळ पोलिसांनी हा बेकायदेशीर गुटखा जप्त केला असून मोहोळ येथील साठे नगरच्या राजकुमार शिवशंकर कुर्डे यास अटक करण्यात आली आहे. (Mohol Police caught illegal stock of gutkha) या प्रकरणाबाबत अधिक तपास मोहोळ पोलीस करीत आहेत.   



कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

आपल्या प्रतीसादाबद्धल धन्यवाद !