शोध न्यूज : अपघाताचे प्रमाण वाढत असतानाच बीड महामार्गावर झालेल्या दोन अपघातात दहा जणांचा मृत्यू झाला असल्याची एक मोठी घटना समोर आली आहे.
गेल्या काही काळात सगळीकडे रस्ते चकाचक झाले पण अपघाताचे प्रमाण मात्र बेसुमार वाढलेले आहे. रोज अनेक अपघात होऊन अनेक निष्पाप नागरिकांचे प्राण जात आहेत. अत्यंत बेपर्वाईने वाहने चालवली जातात आणि प्रत्येकालाच मोठी घाई झालेली आहे . या घाईचा दुष्परिणाम रोज सगळीकडे येताना दिसत आहे. अशातच बीड महामार्गावर एक मोठा आणि अत्यंत भीषण असा अपघात झाला आहे. या अपघातात डॉक्टरसह अन्य लोकांचा प्राण गेला आहे. या मार्गावर झालेल्या दोन अपघातात दहा जणांचा मृत्यू झाला आहे. एका अपघातात बीड कडून अहमदनगरच्या दिशेने निघालेल्या एका रुग्णवाहिकेला अपघात झाला. याच अपघातात एका डॉक्टरसह अन्य चार जणांचा मृत्यू झाला आहे.
बीडमध्ये महामार्गावर झालेल्या दोन अपघातांत १० जणांचा मृ्त्यू झाला आहे. बीडहून अहमदनगरकडे जाणाऱ्या एका अॅम्बुलन्सला भीषण अपघात झाला आहे. या अपघातात डॉक्टरसह ४ जणांचा मृत्यू झाला आहे. अपघातात रुग्णवाहिकेचा चालक भरत सिताराम लोखंडे (मनोज पांगु तिरपुडे, पप्पु पांगु तिरखुंडे यांचा जागीच मृत्यू झाला. तर जबर जखमी झालेले डॉ. राजेश बाबासाहेब झिंजुर्के यांचा रुग्णालयात उपचारादरम्यान मृत्यू झाला. ज्ञानदेव सूर्यभान घुमरे हे या अपघातात गंभीर जखमी झाले असून त्यांच्यावर उपचार सुरु आहेत. आष्टी तालुक्यातील या अपघातात एका भरधाव वेगातील रुग्णवाहिकेने ट्रकला पाठीमागून जोराची धडक दिली. त्यामुळे रुग्णवाहिकेतील चौघांचा जागीच मृत्यू झाला आहे.
ट्रॅव्हल्स उलटून दुसऱ्या अपघातात, सहा जणांचा मृत्यू झाल्याचे समोर आले आहे. मुंबईकडून बीडच्या दिशेने ही बस निघाली होती, (Terrible! Ten people died in the accident!) वेगात निघालेल्या या बसच्या चालकाचे नियंत्रण सुटले आणि प्रवासी बस उलटली. या अपघातात सहा प्रवाशांचा मृत्यू झाला आहे. आष्टा फाटा येथे हा भीषण अपघात झाला आहे.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा
आपल्या प्रतीसादाबद्धल धन्यवाद !