जत : एका अपघातात अत्यंत क्रूर आणि निर्द्यी प्रकार समोर आला असून कारच्या बंपरमध्ये अडकलेल्या अवघ्या दोन वर्षाच्या बालकास तबब्ल सहा किलोमीटर फरफटत नेले गेले आणि या बालकाचा यात मृत्यू झाला.
अलीकडे अपघात ही नित्याची बाब बनली असून निरपराध लोकांच्या जीवाला काहीच किंमत उरली नाही की काय ? असा प्रश्न रोज उभा राहतो. कुणाच्या जीवाची कुणीच पर्वा करीत नाही, ज्याला त्याला फक्त प्रचंड घाई आहे आणि याच घाईत तो समोर येईल त्याला चिरडत धावताना दिसत आहे. आज तर अत्यंत थरारक, निर्दयी घटना समोर आली असून मानवता आता कुठे शिल्लक राहिली आहे की नाही ? या प्रश्नांचे उत्तर देखील मिळणे कठीण झाले आहे. एका कारने अपघात तर केलाच पण दोन वर्षाच्या बालकाच्या जीवाशी अत्यंत क्रूर खेळ खेळला ( The ruthless climax) गेला आहे.
कवठे महांकाळ पोलीस ठाण्याच्या हद्दीत विजापूर- गुहागर राष्ट्रीय महामार्गावर असलेल्या धावडवाडी या गावातील एका कुटुंबाच्या बाबतीत अंत्यत दु:खदायक आणि विदारक घटना घडली आहे. साजिद लालखान शेख आणि त्यांची पत्नी जबीन हे दोघे आपल्या दोन वर्षे वयाच्या अब्दुल या चिमुकल्या मुलास घेवून शेतावर निघालेले होते. ते शेताकडे जात असताना जांभूळवाडी फाट्याजवळ पोहोचले असताना त्यांच्या गाडीला पाठीमागून एका चार चाकी गाडीने जोरदार धडक दिली. या धडकेमुळे साजिद शेख हे उडून दूर अंतरावर जावून पडले.
साजिद शेख हे उडून रस्त्यावर आपटले पण त्यांची पत्नी जबीन आणि दोन वर्षांचा मुलगा अब्दुल हे दोघेही या कारच्या बंपरमध्ये अडकले. तशा परिस्थिती देखील कार चालक थांबला नाही. या माय लेकरांना फरफटत तसाच तो धावत राहिला. साधारण तीनशे फुट अंतरावर गेल्यावर जबीन या रस्त्यावर फेकल्या गेल्या पण दोन वर्षाचा अब्दुल तसाच बंपरमध्ये अडकलेला होता. एवढा भयानक प्रसंग घडत असतानाही कार चालकाला दया आली नाही की त्याने कार थांबवली देखील नाही. (Death of humanity in a tragic accident) उलट अपघात घडल्यानंतर त्याने आणखी सुसाट वेगाने आपली कार दामटली.
जांभूळवाडी फाट्यापासून नागज फाट्यापर्यंत सहा किलोमीटर अंतरापर्यंत कारचालकाने या लहानग्या जीवाला बंपरला अडकलेल्या अवस्थेत फरफटत नेले. पुढे काही लोकांच्या लक्षात हा प्रकार आल्यावर त्यांनी आरडा ओरडा करीत त्याला गाडी थांबविण्यास सांगितले पण त्याने कुणाचेही न ऐकता गाडी तशीच पळवत राहिला. अखेर काही लोकांनी त्याचा पाठलाग सुरु केला. आपला पाठलाग होतोय हे लक्षात येताच त्याने गाडी थांबवली आणि बंपरमध्ये अडकलेल्या दोन वर्षाच्या मुलाला कडून बाजूला फेकले आणि गाडी पुन्हा वेगाने दामटली. हा एकूण प्रकार अत्यंत थरारक आणि निर्दयी होता.
गाडी बेफाम चालवत निघालेल्या या कारचालकास रोखण्यात अखेर काही लोकांना यश आले. त्याची गाडी थांबवून त्याला लोकांनी बेदम चोप दिला. चिमुकल्या अब्दुल यास तातडीने रुग्णालयात नेण्यात आले पण या घटनेत त्याचा मृत्यू झाला होता. पोलिसांनी महादेव मधुकर कुंडले या निर्दयी कारचालकास ताब्यात घेतले आहे. गाडीच्या बंपरमध्ये अडकलेल्या चिमुकल्या मुलाची देखील चालकास कशी दया आली नसेल ? असाच प्रश्न ज्याला त्याला पडलेला होता. अत्यंत थरारक आणि निर्दयीपणाचा कळस अनेक लोकांनी आपल्या डोळ्यांनी पहिला आणि अनुभवला.
हे वाचा :>>
- सासऱ्याच्या शेतात जावयाची आत्महत्या !
- पावसाच्या शक्यतेने बळीराजाचे वाढले टेन्शन !
- निर्दयी, अमानवी ! अपघात तर केलाच पण चिमुकल्याला सहा किमी फरफटले !
अधिक बातम्यांसाठी येथे क्लीक करा > शोध न्यूज

कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा
आपल्या प्रतीसादाबद्धल धन्यवाद !