BREAKING

✪ ✪ ✪➤ ✪➤ ✪➤ . ✪ ✪➤ ✪➤ . ✪➤

४ मार्च, २०२२

'शेतकरी नामर्द आहे..' म्हणत तरुणाची आत्महत्या !

 



पंढरपूर : 'शेतकरी नामर्द आहे' असे म्हणत पंढरपूर तालुक्यातील एका तरुणाने विष प्राशन करून आत्महत्या केली आहे. मृत्युपूर्वी त्याने एक व्हीडीओ व्हायरल केला होता. 


शेतकरी आत्महत्या करण्याच्या अनेक दुर्दैवी घटना आजवर घडल्या आहेत परंतु पंढरपूर तालुक्यात घडलेली घटना काहीशी वेगळीच आहे. शेतकरी असलेल्या सुरज जाधव या मगरवाडी येथील एका तरुणाने विष प्रश्न प्राशन करतानाचा आपला व्हिडीओ तयार करून तो व्हायरल केला होता. सुरज जाधव याने कॅमेऱ्यासमोर विषाची बाटली दातांनी उघडली आणि विष पिण्याआधी त्याने संवाद साधला असल्याचे या व्हीडीओत दिसत आहे.  त्याने दोन दिवसांपूर्वी विष प्राशन  केल्यानंतर उपचारासाठी पंढरपूर येथील सामान्य रुग्णालयात त्याला उपचारासाठी दाखल करण्यात आले होते परंतु त्याचा मृत्यू झाला आहे. 


विष प्राशन करण्याआधी त्याने साधलेल्या संवादात तो शेतकरी जीवनावर नाराज असल्याचे दिसत आहे. " शेतकऱ्याच्या जन्माला आपण कधीच येणार नाही परत ... गेम इज द ओव्हर .. आपलं आयुष्य इथपर्यंतच होतं, इथून पुढे नाही आयुष्य ! शेतकरी नामर्द आहे, आपण शेतकऱ्याच्या जन्माला परत कधीच येणार नाही. सरकारसुद्धा शेतकऱ्याच्या नादी लागत नाही... शेतकऱ्याचा कधी विचार करणार नाही सरकार हे..." असे म्हणत सुरज जाधव या मगरवाडी येथील तरुणाने विष प्राशन केले. 


या घटनेची माहिती मिळताच पंढरपूर तालुक्यातील शेतकऱ्यात एकच खळबळ उडाली असून सगळीकडे या तरुणाची चर्चा सुरु आहे. वीज पुरवठा खंडित केल्यामुळे त्याने हे पाउल उचलले असल्याची चर्चा मगरवाडी परिसरात ऐकायला मिळत होती परंतु याला दुजोरा मिळाला नाही. परंतु कर्जबाजारी झाल्यामुळे या तरुणाने आत्महत्या केली असल्याचे मात्र खात्रीलायक समजते.  सदर घटनेच्या तपासात आणखी माहिती उघड होणार आहेच पण या घटनेने परिसरात प्रचंड हळहळ व्यक्त होऊ लागली आहे.   

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

आपल्या प्रतीसादाबद्धल धन्यवाद !