BREAKING

✪ ✪ ✪➤ ✪➤ ✪➤ . ✪ ✪➤ ✪➤ . ✪➤

२ मार्च, २०२२

कुरियर कंपनीचे कार्यालय फोडले, दोन लाखाची चोरी !

 



पंढरपूर : पंढरपूर तालुक्यात आणखी एक चोरी झाली असून कुरियर कंपनीचे कार्यालय फोडून १ लाख ९४ हजाराची चोरी झाल्याची घटना पंढरपूर तालुका पोलीस ठाण्यात दाखल झाली आहे. 


पंढरपूर येथील नवीन कराड नाका परिसरातील दत्तनगरात झालेल्या लाखोंच्या चोरीने नागरिक हादरले आहेत. छताच्या दरवाजाचा कडी कोयंडा तोडून चोरट्यांनी बंगल्यात प्रवेश करून लाखो रुपयांची चोरी झाल्याची घटना नुकतीच घडली असताना आता कुरियर कंपनीच्या कार्यालयावरच चोरट्यांनी डल्ला मारला आहे. पंढरपूर तालुक्यातील शेगाव दुमाला येथील व्यापारी संकुलात असलेल्या ई कम एक्स्प्रेस लि. दिल्ली यांच्या कुरियर कार्यालयाचे शटर उचकटून चोरी झाली आहे, पंढरपूर आणि मंगळवेढा तालुक्यातील लोकांनी  ऑनलाईन मागविलेले साहित्य या कार्यालयात येत असते आणि  येथून ते संबंधीत ग्राहकांना पोहोच करण्यात येत असते. ग्राहकाकडून मिळणारी रक्कम येथेच जमा केली जाते आणि या कार्यालयातून ती बँकेत भरली जात असते. 


दोन दिवस बँकांना सुट्टी असल्यामुळे ग्राहकाकडून आलेली रक्कम बँकेत भरण्याऐवजी या कार्यालयातील कपाटात ठेवण्यात आली होती. या कार्यालयातील शाखाप्रमुख हे सायंकाळी कार्यालय बंद करून गेले होते त्यानंतर दुसऱ्या दिवशी सकाळी कार्यालयाचे शटर उचकटलेल्या अवस्थेत असल्याचे दिसून आले. तपासणी करून पहिले असता कार्यालयातील कपाटात ठेवलेली १ लाख ९४ हजार ९९१ रुपये चोरीला गेले असल्याचे निदर्शनास आले. शिवाय पाच हजार रुपये किमतीचा या कार्यालयातील सीसीटीव्हीचा डीव्हीआर बॉक्स देखील उचलून नेला आहे. या प्रकरणी पंढरपूर तालुका पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.   


गेल्या काही महिन्यापासून पंढरपूर शहर आणि तालुक्यात चोरांनी भलताच धुमाकूळ घातला आहे. कुलूपबंद घरात घुसून चोरी होण्याचे अनेक प्रकार आजवर समोर आलेले आहेत.  चोरांनी आपला मोर्चा दुकानांकडे वळवला असल्याचेही काही दिवसांपूर्वीच पंढरपूर तालुक्यात दिसून आले. ग्रामीण भागात बस स्थानक परिसरात तसेच महत्वाच्या रस्त्यालगत विविध व्यावसायिकांनी आपली दुकाने थाटली आहेत पण रात्रीत ही दुकाने सुरक्षित राहतील याची मात्र शाश्वती आता राहिली नाही. पंढरपूर तालुक्यातील सुस्ते येथे एका रात्रीत सहा दुकाने फोडल्याची घटना घडल्यानंतर  भोसे पाटी येथे कापड दुकान फोडून सव्वा सात लाखांची चोरी झाली. पंढरपूर शहरात आणि उपनगरात देखील चोरीच्या घटना घडत आहेत.   


 

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

आपल्या प्रतीसादाबद्धल धन्यवाद !