मोहोळ : मंगळवेढा तालुक्यातील तरुणाने मोहोळ तालुक्यातील आपल्या सासऱ्याच्या शेतात जावून झाडाला गळफास आत्महत्या (youth suicide) केल्याची घटना उघडकीस आली आहे.
मंगळवेढा तालुक्यातील डोणज येथील महेश सुरेश केदार या ३५ वर्षाच्या तरुणाने मोहोळ तालुक्यातील कोरवली शिवारात साडीने गळफास घेवून आत्महत्या केली असून कामती पोलीस ठाण्यात या घटनेची नोंद करण्यात आली आहे. पाच वर्षांपूवी डोणज येथील महेश केदार आणि कोरवली येथील प्रियंका विजयकुमार दसाडे यांचा विवाह झाला होता. दरम्यान मागील वर्षी महेश केदार यांचा एक अपघात झाला होता आणि या अपघाताच्या (Accident) घटनेनंतर महेश काही कामधंदा करीत नव्हता. अपघाताची घटना घडल्यापासून तो नैराश्यात असायचा. या नैराश्यातून तो दारूच्या आहारी गेलेला होता.
त्याच्या सततच्या दारू पिण्याला त्याची पत्नी प्रियांका कंटाळली होती तसेच घरातील इतर लोकही त्याला दारू पिण्यापासून परावृत्त करण्याचा पर्यंत करीत होते परंतु महेश सतत दारूच्याच नशेत असायचा. अखेर त्याची पत्नी प्रियांका ही माहेरी निघून गेली आणि गेल्या एक वर्षापासून ती आपल्या माहेरी, कोरवली येथेच रहात आहे. आपल्या पत्नीला भेटण्यासाठी महेश हा कोरवली येथे आला होता. तेथे त्याने शंकर दसाडे यांच्या शेतात चिंचेच्या एका झाडाला साडीने गळफास लावून आत्महत्या (Suicide to go to father-in-law's field) केल्याचे दिसून आले. या घटनेची खबर कामती पोलिसात देण्यात आली असून कोरवली आणि मंगळवेढा तालुक्यातील डोणज परिसरातून हळहळ व्यक्त करण्यात आली.
०० अधिक बातम्यासाठी येथे क्लिक करा !

कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा
आपल्या प्रतीसादाबद्धल धन्यवाद !