BREAKING

✪ ✪ ✪➤ ✪➤ ✪➤ . ✪ ✪➤ ✪➤ . ✪➤

१ मार्च, २०२२

महागाईचा भडका, कोरोनानं छळलं, आता महागाई रडवणार !

 



मुंबई : दोन वर्षांपासून कोरोनानं छळलं, आता महागाई रडवणार असल्याचे संकेत मिळत असून मार्च महिन्याच्या पहिल्याच दिवशी गॅस सिलेंडरची किंमत १०५ रुपयांनी वाढली असून ७ मार्चनंतर इंधनाच्या दरात देखील मोठी वाढ होण्याची शक्यता आहे. 



गॅस  सिलेंडर आणि इंधनाच्या किंमतीत मोठी वाढ होणार याचे संकेत गेल्या काही दिवसांपासून मिळत होतेच. आज मार्च महिन्याच्या पहिल्याच दिवशी हा पहिला फटका बसलेला असून व्यावसायिक सिलिंडरच्या किंमतीत आजपासून १०५ रुपयांनी वाढ झाली आहे. येत्या काही दिवसात घरगुती वापराच्या गॅस सिलिंडरच्या दरात देखील असाच भडका होण्याची चिन्हे स्पष्ट आहेत. आज केवळ व्यावसायिक गॅस सिलिंडरच्या किंमती वाढविल्या आहेत आणि घरगुती सिलिंडर दरात कोणताहीं बदल आलेला नाही. परंतु हे समाधान अधिक काळ टिकणारे नसून येत्या काही दिवसात घरगुती वापराच्या सिलिंडरच्या दरांनाही महागाईची आग लागणार असल्याचे दिसत आहे. 



देशात निवडणुकांचा कालावधी असला की गॅस आणि इंधनाचे दर स्थिरावतात आणि निवडणूक संपली की सगळा हिशोब चुकता केला जातो हा आजवरचा देशाचा अनुभव आहे. सद्या पाच राज्यातील निवडणूक होत असल्याने हे दर स्थिर दिसत आहेत. ६ ऑक्टोबर २०२१ पासून घरगुती गॅस सिलिंडरचे दर स्थिर असल्याचे पहायला मिळालेले आहे. या दरम्यान कच्च्या तेलाच्या किमती प्रति बॅरल १०२ डॉलरच्याही पुढे गेल्या आहेत. तेलाच्या किमती वाढत असतानाही देशातील हे दर स्थिर आहेत. व्यावसायिक सिलिंडर मात्र सतत भडकत राहिले असून ऑक्टोबर २०२१ ते फेब्रुवारी २०२२ या दरम्यान व्यावसायिक वापराच्या गॅस सिलिंडरच्या किंमतीत १७० रुपयांनी वाढ झाली आहे. आता मार्च महिन्याच्या पहिल्याच दिवशी हे सिलिंडर १०५ रुपयांनी महागले आहे. 



मुंबईत आता १९ किलोच्या व्यावसायिक एलपीजी सिलिंडरची किंमत १९६३ रुपये झाली आहे तर दिल्ल्लीत हे सिलिंडर आजपासून २ हजार १२ रुपयांना मिळणार आहे, कोलकात्यात हा दर २ हजार ९५ रुपयावर गेला आहे.  व्यावसाईक सिलिंडर दरात ही वाढ असली तरी याची झळ ग्राहकांनाच बसणार आहे. पाच राज्यातील निवडणूक संपली की घरगुती गॅस सिलिंडर आणि इंधनाचे देखील दर मोठ्या प्रमाणात वाढणार असल्याचे संकेत आधीपासून मिळत आहेत. गेल्या काही दिवसांपासूनच ही शक्यता व्यक्त करण्यात येत आहे. त्यामुळे सामान्य ग्राहकांना महागाईच्या आणखी होणाऱ्या भडक्याला सामोरे जावे लागणार आहे. गेल्या दोन वर्षात कोरोनाने प्रचंड छळले आहे, आता आगामी काळात महागाई सामान्य माणसांना रडविणार असल्याचे संकेत मिळत आहेत. 



रशिया आणि युक्रेन यांच्यातील युद्धाचा परिणाम देखील या महागाईवर होणार आहे. मागील काही दिवसांपासून आंतरराष्ट्रीय बाजारात कच्च्या तेलाचे दर प्रचंड वाढलेले आहेत त्यातच रशिया- युक्रेन युद्धामुळे ब्रेंट क्रूड तेलाच्या दरात मोठी वाढ झालेली आहे परतू देशात इंधनाच्या दरात वाढ करण्यात आलेली नाही. गेल्या तीन महिन्यांपासून पेट्रोल डीझेल दरात वाढ झालेली नाही. अनेक राज्यात सुरु असलेल्या निवडणुकांचा हा परिणाम असून आता या निवडणुका संपत आलेल्या आहेत. ७ मार्चच्या नंतर अथवा मार्च महिन्याच्या मध्यात हा भडका उडण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. 


कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

आपल्या प्रतीसादाबद्धल धन्यवाद !