BREAKING

✪ ✪ ✪➤ ✪➤ ✪➤ . ✪ ✪➤ ✪➤ . ✪➤

२ मार्च, २०२२

सरकार पायउतार होण्यासाठी पांडुरंगाला साकडे !

 



पंढरपूर : राज्यातील महाविकास आघाडीचे सरकार पायउतार व्हावे यासाठी पांडुरंगाच्या चरणी साकडे घातले असल्याचे भाजप खासदार प्रताप पाटील चिखलीकर यांनी सांगितले. 


 राज्यात महाविकास आघाडीचे सरकार स्थापन झाल्यापासून भाजपचे अनेक नेते राज्य सरकार कोसळणार असल्याचे सांगत आहेत परंतु तो दिवस अद्याप तरी आलेला नाही. केंद्रीय तपास यंत्रणाही महाविकास आघाडी सरकार मधील अनेक नेत्यांच्या मागे लागल्या असून राज्याचे तत्कालीन गृहमंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे नेते अनिल देशमुख यांना सक्तवसुली संचालनालयाने अटक केली त्यामुळे त्यांना राजीनामा द्यावा लागला आहे. त्यांच्या पाठोपाठ नुकतीच राज्याचे अल्पसंख्यांक मंत्री नवाब मलिक यांना ईडी ने अटक केली आहे. आणखी काही मंत्री लवकरच तुरुंगात जाणार असल्याचे भाजप नेते किरीट सोमय्या सांगत आहेत. आता खासदार प्रताप पाटील चिखलीकर यांनी तर थेट पंढरीच्या पांडुरंगालाच साकडे घातले आहे. 


महाविकास आघाडी सरकारमधील एकेक मंत्री तुरुंगात जात आहेत त्यामुळे भ्रष्टाचारी सरकार पायउतार झाले पाहिजे आणि त्यासाठीच आपण पांडुरंग चरणी तसे साकडे घातले आहे असे खा. चिखलीकर यांनी पत्रकारांशी बोलताना सांगितले.  मराठा आरक्षणाबाबत बोलताना त्यांनी सार्वजनिक बांधकाम मंत्री अशोक चव्हाण यांच्यावर टीका केली. अशोक चव्हाण जोपर्यंत मराठा समाजाच्या आरक्षण उप समितीचे अध्यक्ष आहेत तोपर्यंत मराठा समाजाला आरक्षण मिळू शकत नाही. छत्रपती शिवाजी महाराज यांचे नाव घेऊन राज्याचा कारभार चालतो पण त्यांचा वंशाजना मराठा आरक्षणासाठी उपोषण करावे लागते यापेक्षा अधिक दुर्दैव ते काय असू शासकते ? अशा शब्दात त्यांनी खेद व्यक्त केला. 



कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

आपल्या प्रतीसादाबद्धल धन्यवाद !