BREAKING

✪ ✪ ✪➤ ✪➤ ✪➤ . ✪ ✪➤ ✪➤ . ✪➤

८ मार्च, २०२२

सोलापूर येथील पोलीस अधिकारी लाच घेताना जाळ्यात !

 



सोलापूर : एका गुन्ह्याप्रकरणी आरोपी न करण्यासाठी पन्नास हजार रुपयांची लाच घेताना सोलापूर येथील जोडभावी पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक दिनेश कुलकर्णी यांना पकडण्यात आले आहे. 


जोडभावी पोलीस ठाण्यात दाखल करण्यात आलेल्या एका गुन्ह्यात तक्रारदाराच्या अन्य नातेवाईकांना आरोपी न बनविण्यासाठी सहाय्यक पोलीस निरीक्षक दिनेश श्रीकांत कुलकर्णी यांनी एक लाखाची लाच मागितली असल्याची तक्रार तक्रारदाराने लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे केली. या तक्रारीची पडताळणी करून लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने सापळा लावला. या सापळ्यात सहायक पोलीस निरीक्षक पन्नास हजार रुपयांची लाच घेतली नसली तरी त्यांच्यावर कारवाई करण्यात आली.  या घटनेने सोलापूर पोलीस दलात एकच खळबळ उडाली आहे.  


तक्रारदार यांचा मेहुणा यांच्याविरोधात जोडभावी पोलीस ठाण्यात एक गुन्हा दाखल झालेला असून याचा तपास सहायक पोलीस निरीक्षक दिनेश कुलकर्णी  करीत आहेत. या गुन्ह्यात तक्रारदार, त्यांची पत्नी, सासू, मेहुणा, मेहुणी, मेहुणीचा पती हे सगळे आरोपी होत आहेत असे सपोनि कुलकर्णी यांनी सांगितले. जर या सगळ्यांना आरोपी करायचे नसेल ते एक लाख रुपये द्यावेत अशी लाचेची मागणी कुलकर्णी यांनी केली. एक लाखाच्या रकमेबाबत त्यांच्यात तडजोड होऊन पन्नास हजार रुपये देण्याचे ठरले. त्यानुसार तक्रारदाराने लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे याची तक्रार केली. त्यानुसार या विभागाने पडताळणी केली असता लाचेची मागणी केल्याचे निष्पन्न झाले. प्रत्यक्षात त्यांनी लाच घेतली नसली तरी पडताळणीत आढळल्याने लाचेची मागणी केल्याबद्धल  सहायक पोलीस निरीक्षक दिनेश कुलकर्णी यांच्यावर कारवाई करण्यात आली आहे.    


कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

आपल्या प्रतीसादाबद्धल धन्यवाद !