BREAKING

✪ ✪ ✪➤ ✪➤ ✪➤ . ✪ ✪➤ ✪➤ . ✪➤

९ मार्च, २०२२

तरुण शिक्षकाची गळफास घेऊन आत्महत्या !

 



मंगळवेढा : अवघ्या तीस वर्षे वयाच्या एका शिक्षकाने आत्महत्या केल्याने मंगळवेढा तालुक्यात हळहळ व्यक्त करण्यात आली असून आत्महत्येचे नेमके कारण समजले नाही. (Suicide of a young teacher) 


सोलापूर जिल्ह्यात अलीकडे आत्महत्या होण्याचे प्रमाण वाढताना दिसत असून आर्थिक अडचणीमुळे अथवा सावकाराच्या जाचामुळे आत्महत्या केल्याच्या घटना समोर येत असतात. मंगळवेढा तालुक्यातील या घटनेने मात्र अनेकांना धक्का बसला आहे. तालुक्यातील शिवनगी येथील अवघ्या तीस वर्षे वयाचे शिक्षक सत्यवान मच्छिंद्र कांबळे यांनी घरातच गळफास लावून आत्महत्या केल्याची घटना सकाळी उघडकीस आली आहे. 


शिवणगी - सलगर (खु.) या रस्त्यावरील सोमुत्ते वस्ती जवळ घडलेल्या या दुर्घटनेमुळे परिसरात खळबळ उडाली. पहाटे तीन वाजण्याच्या दरम्यान ही घटना घडली असण्याचा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे.  सत्यवान कांबळे हे उमदी येथील एका शाळेत शिक्षक असून आज पहाटेच्या सुमारास त्यांनी आपल्या राहत्या घरात गळफास घेऊन आत्महत्या केली आहे. सत्यवान कांबळे यांच्या पत्नी पहाटे उठल्या असत्या त्यांना पती सत्यवान हे दिसले नाहीत. एवढ्या पहाटे ते कोठे गेले असावेत याचा अंदाज त्यांनी घेतला. यावेळी एका खोलीत गळफास घेऊन त्यांनी आत्महत्या केली असल्याचे निदर्शनास आले. 


सदर घटना निदर्शनास आल्यानंतर परिसरात याची माहिती मिळाली आणि या घटनेने अनेकांना धक्का बसला तर अनेकांनी हळहळ व्यक्त केली. उमदी येथे शिक्षक असलेले सत्यवान कांबळे हे मुलाचे मंगळवेढा तालुक्यातील रड्डे या गावाचे असून शिवणगी येथे ते आजी आजोबासमवेत सहकुटुंब राहत होते. त्यांनी आत्महत्येसारखे टोकाचे पाऊल कशासाठी उचलले हे लगेच समजू शकले नाही. परंतु एका तरुण असलेल्या शिक्षकाने केलेल्या आत्महत्येने परिसरात दु:ख व्यक्त करण्यात येत आहे. (Mangalawedha crime)   


कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

आपल्या प्रतीसादाबद्धल धन्यवाद !