BREAKING

✪ ✪ ✪➤ ✪➤ ✪➤ . ✪ ✪➤ ✪➤ . ✪➤

४ मार्च, २०२२

अन्यथा गाडी होईल आता थेट जप्त !


 



नवी दिल्ली : गाडीला फिटनेस प्लेट लावणे आता बंधनकारक होणार असून ही प्लेट नसल्यास वाहन थेट जप्त करण्याची कारवाई केली जाणार आहे. केंद्र सरकारने याबाबत मोठे पाउल उचलले आहे. (Mandatory fitness certificate for the vehicle )


वाहनापासून  होणारे प्रदूषण कमी करण्यासाठी केंद्र सरकार सतत प्रयत्न करीत असून वाहनांच्या विषयी एकेक कायदे केले जात आहेत. वरचेवर प्रदूषण वाढत असून यात वाहनांच्या चुकीच्या वापरामुळे होणाऱ्या प्रदूषणाचा मोठा सहभाग आहे. हे प्रदूषण कमी करण्यासाठी केंद्र सरकारने मोठे पाउल उचलले असून रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्रालयाने नवीन नियमांसाठी मसुदा अधिसूचना जारी केली आहे. जनता आणि भागधारक यांच्याकडून सूचना मागविण्यात आल्या असून एक महिन्यात या सूचना प्राप्त होतील. त्यानंतर शासनाकडून नवा नियम लागू करण्यात येणार आहे. 


देशातील सर्वच खाजगी आणि व्यावसायिक वाहनाच्या विंडशिल्डवर फिटनेस प्रमाणपत्राची प्लेट लावणे बंधनकारक करण्यात आले आहे. वाहनांच्या नंबरप्लेटसारखीच असलेल्या या प्लेटवर संबंधित वाहन किती तारखेपर्यंत फीट असेल याची तारीख निळ्या स्टिकरवर पिवळ्या रंगात लिहिलेली असणार आहे. म्हणजेच वाहनांच्या फिटनेसचे एक्सपायरी डेट (Expiry date) नमूद केलेली असणार आहे. अशी प्लेट नसलेल्या वाहनावर वाहनजप्तीची कारवाई केली जाणार असून ती पुन्हा कधीच रस्त्यावर दिसणार नाहीत अशी तरतूद करण्यात आली आहे.  


लाखों जुनी वाहने 

दहा वर्षांपेक्षा जुनी (old vehicle) असलेली डिझेलवरील वाहने आणि पंधरा वर्षांपेक्षा जुनी असलेली खाजगी वाहने रस्त्यावरून हटवली जाण्याचे आदेश दिले जाणार आहेत त्यामुळे अशी वाहने रस्त्यावर दिसणार नाहीत. वीस वर्षांपेक्षा जुनी असलेली ५१ लाख हलकी वाहने आणि पंधरा वर्षापेक्षा अधिक वर्षे जुनी असलेली ३४ लाख वाहने सद्या रस्त्यावर धावत आहेत. नवा कायदा येत असून या कायद्यानुसार जबर दंडाची देखील तरतूद करण्यात आली आहे. 



लगेच स्क्रॅप !
पंधरा वर्षांपेक्षा जुनी असणारी मध्यम आणि अवजड व्यावसायिक वाहने जवळपास १७ लाख असून ही वाहने वैध फिटनेस प्रमाणपत्राशिवाय रस्त्यावरून धावत आहेत.  दुचाकी वाहनांसाठी देखील हा कायदा असून फिटनेस प्रमाणपत्र मडगार्ड अथवा मास्क किंवा ऍप्रन अशा ठिकाणी असलेल्या रिकाम्या जागेत लावले जाणार आहे. हरियाणा आणि दिल्ल्ली सरकारने असा निर्णय आधीच दिलेला असून १ एप्रिलपासून हा नियम लागू केला जाणार आहे. हा नवा नियम लागू होताच फिटनेस प्रमाणपत्र नसलेली जुनी वाहने रस्त्यावर आल्यास टी लगेच जप्त करण्यात येणार असून ती वाहन मालकास परत मिळणार नाही. अशी वाहने थेट स्क्रॅप करण्यासाठी पाठवली जाणार आहेत त्यामुळे वाहन मालकांनी वेळीच काळजी घेण्याची गरज आहे. या नव्या कायद्याचे उल्लंघन केल्यास आपले वाहन स्क्रॅप झालेले पाहण्याची वेळ येणार आहे.    


कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

आपल्या प्रतीसादाबद्धल धन्यवाद !