BREAKING

✪ ✪ ✪➤ ✪➤ ✪➤ . ✪ ✪➤ ✪➤ . ✪➤

२२ मार्च, २०२२

पट्ठ्याने पेटवले आपलेच राहते घर !

 


सोलापूर : एक छोटसं का होईना पण आपलं घर असावं असं प्रत्येकालाच वाटत असतं पण एका पट्ठ्याने आपलेच राहते घर आपल्याच हाताने पेटवून दिल्याची (House was set on fire) अजब आणि धक्कादायक घटना सोलापूर जिल्ह्यात घडली आहे. 


समाजातील अनेक लोक बेघर आहेत आणि निवाऱ्यापुरतं तरी आपलं स्वत:चं घर असावं हे प्रत्येकाचे एक स्वप्न असते. काहींचे हे स्वप्नं पूर्ण होते तर काहींच्या नशिबी आभाळाचं पांघरूण येतं. कष्टानं बांधलेलं घर माणूस जीवापाड जपतो पण एका पट्ट्याची सटकली आणि त्याने आपलेच घर आपल्याच हाताने पेटवून दिल्याची घटना सोलापुरात घडली आहे. अक्कलकोट रोडवरील औद्योगिक वसाहतीजवळ एका वस्तीत काल सायंकाळी हा अजब प्रकार घडला आहे. (He set fire to his own house) पेटवलेल्या या घरात सुदैवाने पत्नी आणि मुले नव्हती त्यामुळे काही जीवितहानी झाली नाही पण शेजारच्या घरांचे नुकसान यामुळे झाले आहे.


गोदुताई विडी घरकुल रस्त्यावरील माळीनगर येथे येथे राहणाऱ्या शाम भंडारी नावाच्या व्यक्तीने आपले घर पेटविण्याचा प्रकार केला आहे. या शाम भंडारी याचा आपल्या पत्नीसोबत वाद होता. (Family Dispute)  गेल्या चार दिवसापासून हा वाद अधिकच वाढला होता. दोघात भांडण झाले की शाम भंडारी हा घर पेटवून देण्याची धमकी पत्नीला देता होता. अखेर आज त्याने ही धमकी खरी केली आणि आपल्याच हाताने आपले घर पेटवून दिले. पत्नी आणि मुले घरातून निघून गेल्यावर त्याने हे कृत्य केले. घराला अचानक आग लागल्याचे पाहून शेजारी देखील गोंधळून आणि घाबरून गेले. 


शाम भंडारी याने पत्नीशी झालेल्या भांडणातून स्वत:चे घर पेटवून दिले असले तरी घराला लागलेल्या आगीमुळे शेजारच्या घरांचेही नुकसान झाले. या आगीमुळे शेजाऱ्यांचीही अनेक घरे जळण्याचा मोठा धोका होता परंतु अग्निशामक दलाने पाण्याचा मारा करून ही आग वेळीच नियंत्रणात आणली त्यामुळे शेजारी अधिक धोका होऊ शकला नाही. (Solapur Crime news) भंडारी यांनी आपले घर पेटवले पण त्यानंतर ही आग शेजाऱ्यांच्या घरापर्यंत पोहोचली असल्याचे नागरिकांनी सांगितले. कौटुंबिक वादातून भंडारी याने हे कृत्य केले पण त्याची झळ अनेकांना बसली. (family dispute set his own house on fire)  वेळीच ही आग आटोक्यात आणली नसती तर भलताच अनर्थ घडण्याची शक्यता होती.  


अधिक बातम्यांसाठी येथे क्लीक करा > शोध न्यूज  


कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

आपल्या प्रतीसादाबद्धल धन्यवाद !