नवी दिल्ली : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या वक्तव्याचा राष्ट्रवादीच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी पुरती पोलखोल केली असून यामुळे भाजपची मोठी अडचण झाली आहे. 'प्रधानमंत्रीजी, आपसे नाराज नही, हैरान हूँ' अशा भाषेत खा. सुळे यांनी उत्तर दिले आहे.
राष्ट्रपतींच्या अभिभाषणावरील चर्चेला उत्तर देताना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी काँग्रेस पक्षावर मोठी टीका केली आणि कोरोनाच्या काळत काँग्रेस चुकीच्या पद्धतीने वागल्याचे सांगितले. महाराष्ट्रातील मजूर बाकीच्या राज्यात गेल्याने कोरोना वाढला, महाराष्ट्रातील काँग्रेसने ऐन कोरोनाच्या काळात श्रमिक रेल्वे पाठवल्याने कोरोनाचा वेगाने प्रसार झाला अशी विधाने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केली. यावर काँग्रेसने तिखट प्रतिक्रिया तर दिली आहेच पण राष्टवादीच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी पुराव्यासह उत्तर देऊन पंतप्रधानांच्या विधानांची पोलखोल केली आहे. सुळे यांनी एक पत्रकार परिषद घेऊन भाजपाला जोरदार चपराक लगावली आहे.
खासदार सुप्रिया सुळे याची थेट तत्कालीन रेल्वे मंत्री पियुष गोयल आणि अन्य केंद्रीय मंत्र्यांचा संदर्भ देत मंत्र्यांचे पत्र दाखवत मोदी यांच्या वक्तव्याचा पर्दाफाश केला. श्रमिक रेल्वे या काँग्रेसने नव्हे तर केंद्र सरकारने सोडल्या आहेत आणि देशात सर्वाधिक श्रमिक रेल्वे या गुजरातमधून सोडण्यात आल्या आहेत असे सांगून त्यांनी आकडेवारीच मांडली. महाराष्ट्रातून ८१७ श्रमिक रेल्वे परराज्यात गेल्या तर गुजरातमधून सोडण्यात आलेल्या श्रमिक रेल्वेची संख्या १ हजार ३३ एवढी होती. अशी माहिती यावेळी सुप्रिया सुळे यांनी दिली आहे. थेट रेल्वेमंत्री यांचे पत्र आणि सोडण्यात आलेल्या रेल्वेची संख्या यामुळे भाजपाची बोलती खा. सुप्रिया सुळे यांनी बंद केली आहे.
महाराष्ट्राबद्धल असे कोणी बॊलले तर आम्ही सहन करणार नाही, मोदी यांनी केलेल्या वक्तव्याला काही शास्त्रीय पुरावे नाहीत, मी मात्र सगळे पुरावे देऊन बोलत आहे. त्यांना महाराष्ट्राबाबत इतका द्वेष का वाटतो ? याचे उत्तर मोदी यांनी द्यायला हवे. मुंबईचे महत्व कमी करण्याचा सतत प्रयत्न केला जातोय आणि हेच त्यांना महत्वाचे वाटते काय ? असा जळजळीत सवाल त्यांनी यावेळी उपस्थित केला आहे. 'प्रधानमंत्रीजी, आपसे नाराज नही, हैरान हूँ' असे देखील खासदार सुप्रिया सुळे म्हणाल्या आहेत.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा
आपल्या प्रतीसादाबद्धल धन्यवाद !