BREAKING

✪ ✪ ✪➤ ✪➤ ✪➤ . ✪ ✪➤ ✪➤ . ✪➤

११ फेब्रु, २०२२

शिक्षण राज्यमंत्री बच्चू कडू यांना शिक्षा !



चांदूरबाजार : महाराष्ट्र राज्याचे शिक्षण राज्यमंत्री बच्चू कडू यांना न्यायालयाने सश्रम कारावासाची शिक्षा सुनावली असून कार्यकत्यात प्रचंड अस्वस्थता पसरली आहे.


अत्यंत आक्रमक आणि सामान्य माणसासाठी सदैव झटणारे बच्चू कडू हे विद्यमान महाविकास आघाडी सरकारमध्ये शिक्षण राज्यमंत्री आहेत. २०१४ सालच्या विधानसभा निवडणुकीत उमेदवारी अर्ज सादर करताना दाखल केलेल्या प्रतिद्न्यापत्रात कडू यांनी मुंबईतील फ्लॅटची माहिती लपविली असल्याचा  ठपका त्यांच्यावर ठेवण्यात आला आहे . भारतीय जनता पक्षाचे नगरसेवक गोपाल तिरमारे यांनी याबाबत कडू यांच्या विरोधी तक्रार दाखल केली होती. यावर सुनावणी होऊन चांदूरबाजार प्रथमवर्ग न्यायालयाने कडू यांना २ महिन्याच्या सश्रम कारावासाची शिक्षा सुनावली आहे.


सन २०१४ मध्ये झालेल्या विधानसभा निवडणकीत नियमानुसार निवडणूक आयोगाला आपल्या संपत्तीची माहिती देणारे प्रतिद्न्यापत्र बच्चू कडू यांनीसादर केले होते. त्यात त्यांनी मुंबई इथे असलेल्या फ्लॅट बाबतीत कोणतीही माहिती दिलेली नव्हती. त्यामुळे अमरावतीच्या अचलपूर येथील भारतीय जनता पक्षाचे नगरसेवक गोपाल तिरमारे यांनी तक्रार दाखल केली होतीया तक्रारीवर सुनावणी झाली आणि चांदूरबाजार प्रथमवर्ग न्यायालयाने राज्यमंत्री बच्चू कडू यांना दोन महिने सश्रम कारावासाची आणि २५ हजार रुपये दंडाची शिक्षा सुनावली आहे.

 .

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

आपल्या प्रतीसादाबद्धल धन्यवाद !