BREAKING

✪ ✪ ✪➤ ✪➤ ✪➤ . ✪ ✪➤ ✪➤ . ✪➤

६ फेब्रु, २०२२

महावितरण सहाय्यक अभियंत्यांची आत्महत्या !

 




बारामती : मुळचे सोलापूर येथील असलेले आणि महावितरणचे सहायक अभियंता मनीष दंडवते यांनी राहत्या घरीच गळफास घेऊन आत्महत्या केल्याच्या घटनेने एकच खळबळ उडाली आहे. 


सोलापूर येथील रहिवासी असणारे दंडवते हे बारामती येथील उर्जा भवन वसाहतीत एकटेच रहात होते. त्यांचे कुटुंब सोलापूर येथे राहत होते. दंडवते हे मागील दोन दिवसांपासून कामावर हजर नव्हते. कुटुंब बारामती येथे नसल्यामुळे त्यांना जेवणासाठी बाहेरून डबा येत होता. नेहमीप्रमाणे एक व्यक्ती त्यांच्या जेवणाचा डबा घेऊन त्यांच्या घरी गेला पण दरवाजा उघडला जात नव्हता. दरवाजा वाजवून आणि आवाज देवून काहीच प्रतिसाद येत नसल्याने त्या व्यक्तीने खिडकीतून आत डोकावून पहिले. आत दंडवते यांनी दोरीने गळफास घेतलेल्या अवस्थेत त्यांचा मृतदेह लटकत्या अवस्थेत दिसला. 


जेवणाचा डबा घेऊन आलेल्या व्यक्तीने ही बाब इतरांच्या लक्षात आणून दिली. पोलिसांना माहिती कळविताच पोलीस घटनास्थळी दाखल झाले. आतून बंद असलेला दरवाजा तोडण्यात आला. पोलिसांनी आत जाऊन पहिले असता मनीष दंडवते या सहाय्यक अभियंत्यांनी नायलॉनच्या दोरीने गळफास घेऊन आपल्या जीवनाचा शेवट केलेला दिसून आला. आत्महत्या करण्याचे कारण लगेच समजू शकले नाही पण महावितरण विभागात या घटनेने हळहळ आणि प्रचंड खळबळ उडाली आहे. 


पंढरपूर तालुक्यातील महावितरणाच्या एका  सहायक अभियंत्याने कुटुंबासह आत्महत्या करण्याची सूचना दिली आणि ते बेपत्ता झाले होते त्यामुळे पंढरपूर नव्हे तर सोलापूर जिल्ह्यात खळबळ उडाली होती. अखेर पोलिसांनी त्या कुटुंबाचा शोध घेतला. सोलापूर जिल्ह्यातील बारामती येथे कार्यरत असलेल्या महावितरण सहायक अभियंत्यांनी मात्र आपल्या जीवनाचा शेवट केला आहे.  


कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

आपल्या प्रतीसादाबद्धल धन्यवाद !