BREAKING

✪ ✪ ✪➤ ✪➤ ✪➤ . ✪ ✪➤ ✪➤ . ✪➤

५ फेब्रु, २०२२

भारतात आढळली सोन्याची खाण ! इंडिया मालामाल !!




राजस्थान : भारत देशाच्या अर्थव्यवस्थेला बळकटी देणारी एक महत्वपूर्ण घटना घडली असून देशात चक्क एक सोन्याची खाण आढळून आली आहे. 


'डाल डाल पर सोने की चिडिया करती ही बसेरा, ये भारत देश है मेरा ..' असे भारत देशाचे वर्णन करण्यात येत होते, देशात सुबत्ता  नांदत असल्यामुळे भारत देशावर परकीयांचे आक्रमण होईपर्यंत देशात सोन्याचा धूर निघत होता असे सांगितले जात होते पण पुढे देशाला आर्थिक अडचणीला सामोरे जावे लागले. आता मात्र देशाच्या अर्थव्यवस्थेला मोठी बळकटी मिळेल अशी माहिती समोर आली आहे. देशातील जमिनीत दडलेलं सोनं आता देशाला मिळणार आहे. भारत देशात सोन्याची खाण आढळली असल्याची बातमी देशवासियांना मिळाली आहे. राजस्थानमधील भिलवाडा जिल्ह्यातील कोटडी भागात ही सोन्याची खाण सापडली आहे. 


मिनरल एक्स्प्लोरेशन कॉर्पोरेशनने २००८ मध्ये कोटडी परिसरात केलेल्या सर्वेक्षणाचा अहवाल आता प्राप्त झाला असून जमिनीत सोन्याचे आणि तांब्याचे मोठे साठे असल्याचे दिसून आले असल्याचे स्पष्ट करण्यात आले आहे.  जमिनीच्या खाली ६० ते १६० मीटर आत हा सोन्या तांब्याचा खजिना असल्यचे या अहवालात म्हटले आहे. जमिनीच्या पोटात ६०० किलो सोने आणि २५० टन तांब्याचे साठे असण्याचा अंदाज या सर्वेक्षण अहवालातून करण्यात आला आहे.  सदर खाणीसाठी भूविज्ञान विभागाने निविदाही जारी केली असून त्यात ब्लॉकची किंमत १ हजार ८४० कोटी रुपये निश्चित करण्यात आली आहे. या निविदेची बोली १२८ कोटीपासून सुरु करण्यात येणार आहे. 


राजस्थानमधील भिलवाडा जिल्ह्यात आशियातील सगळ्यात मोठ्या अशा दोन खाणी आहेत. जगातील दुसरी आणि आशिया खंडातील सर्वात मोठी असणारी जस्त धातूची खाल जिल्ह्यातल्याच आगुचा परिसरात आहे. आता देशात सोन्याचीच खाण मिळाली असल्याने देशाच्या अर्थव्यवस्थेला मोठी बळकटी मिळणार आहे.   



कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

आपल्या प्रतीसादाबद्धल धन्यवाद !