आत्महत्येचे कारण
अद्याप अज्ञातच !
पंढरपूर : पंढरपूर शहरात एकाच दिवशी एक नव्हे तर दोघांनी गळफास घेऊन जीवनाचा शेवट केला असून यात एका तरुण आणि एका तरुणीचा समावेश आहे.
पंढरपूर शहरातील एकाच भागातील या दोन घटना असल्या तरी दोन वेगवेगळ्या घटनात दोघांनी आपल्या जीवनाचा अंत केला आहे. एक घटना अनिलनगर भागात घडली आहे तर दुसरी घटना जुनी पेठ पोलीस चौकीच्या परिसरात घडली असून दोन्ही घटनाची नोंद पंढरपूर शहर पोलीस ठाण्यात करण्यात आली आहे.
अनिलनगर भागात घडलेल्या घटनेत संतोष प्रकाश साळुंखे या तरुणाने गळफास घेऊन आत्महत्या केली आहे. संतोष याचे वय २६ वर्षांचे होते. अनिलनगर परिसरात म्हसोबा मंदिराच्या जवळ राहणाऱ्या संतोष साळुंखे याने छताला साडी बांधून गळफास घेतला आणि आपल्या जीवनाची अखेर केली. स्वप्नील टमटम यांनी या घटनेची खबर पंढरपूर शहर पोलिसांना दिल्यानंतर पोलिसांनी या घटनेची नोंद करून पुढील कार्यवाही सुरु केली. सदर आत्महत्या कशासाठी केली याचे नेमके कारण समोर आले नसले तरी सावकारीच्या जाचातून ही घटना घडली की काय ? हे तपासात समोर येईल. तरुण वयात या तरुणाने केलेल्या आत्महत्येमुळे परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.
संतोष साळुंखे यांच्या आत्महत्येची घटना समोर आल्यानंतर शहरात आणखी एक घटना घडली आहे. एकवीस वर्षीय तरुणीने देखील साडीने गळफास लावून आत्महत्या केली आहे. जुनी पेठ पोलीस चौकीच्या समोरच्या परिसरात ज्याती शुभम परदेशी या २१ वर्षाच्या तरुणीने गळफास लावून घरातच आत्महत्या केली आहे. आत्महत्या केल्याचा प्रकार निदर्शनास येताच तातडीने उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले पण तत्पूर्वी या तरुणीचा मृत्यू झाला होता.
एकाच दिवशी झालेल्या दोन घटनामुळे पंढरपूर हादरले असून पालकांत चिंतेचे वातावरण आहे. वेगवेगळ्या घडलेल्या या दोन्ही घटनेत आत्महत्येचे कारण समजू शकले नाही. दोन्ही घटनात आत्महत्या करणरे तरुण होते त्यामुळे अधिक हळहळ व्यक्त करण्यात येत असून पोलीस अधिक तपास करीत आहेत.
वाचा : > पंढरीत एकावर पाच जणांनी केला कोयत्याने हल्ला !
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा
आपल्या प्रतीसादाबद्धल धन्यवाद !