BREAKING

✪ ✪ ✪➤ ✪➤ ✪➤ . ✪ ✪➤ ✪➤ . ✪➤

४ जाने, २०२२

पंढरपूर : पाच जणांनी एकावर केला कोयत्याने हल्ला !

 

कोयता विरुद्ध कोयता !




पंढरपूर : पाच जणांनी मिळून एकावर कोयत्याने हल्ला केल्याचा गुन्हा पंढरपूर शहर पोलिसात दाखल झाला असून 'कोयता विरुद्ध कोयता' असा संघर्ष सुरु झाल्याचे दिसून आले आहे. 


गोविदापुरा भागात गेल्या तीन दिवसांपासून कोयता हा एकच विषय चर्चेला आला आहे. पत्नीकडे अकारण पाहत असल्याच्या संशावरून नवनाथ सुब्राव कोरे आणि पूनम नवनाथ कोरे यांनी आपल्यावर कोयत्याने हाल केल्याची तक्रार महादेव भोलेनाथ अभंगराव यांनी दिली होती. या घटनेने लखुबाई मंदिर परिसरात भलतीच खळबळ उडाली असतानाच पूनम नवनाथ कोरे यांनीही पोलिसात फिर्याद दिली आहे. पाच जणांनी मारहाण केल्याची फिर्याद देण्यात आली असून पंढरपूर शहर पोलिसात तसा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. 


पूनम कोरे यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार पाच जणांनी कोयता आणि लोखंडी पाईपने मारहाण केली आहे. या फिर्यादीनुसार गोविंदपुरा, लखुबाई मंदिराजवळ राहणारे  सतीश अभंगराव, महादेव अभंगराव, राहुल अभंगराव, विनोद अभंगराव, हर्षद अभंगराव  हे कोरे यांच्या घरासमोरील ओट्यावर बसून घाण व्हिडीओ पाहत आरडओरडा करतात. त्यामुळे कोरे कुटुंब त्यांना ओट्यावर बसण्यास प्रतिबंध करीत असतात. 


नवनाथ कोरे आणि त्यांच्या पत्नी पूनम कोरे हे आपल्या घरासमोरील अंगणात पायरीवर बसलेले असताना सदर पाच जण त्यांच्याकडे वाकून पहात होते, यावेळी कोरे यांनी आमच्याकडे का पाहता ? आमच्या ओट्यावर का बसता ? अशी विचारणा केली. यामुळे पाच जणांना राग आला आणि त्यांनी पळत जाऊन कोयता आणि लोखंडी पाईप आणला. सतीश अभंगराव याने नवनाथ कोरे याच्या उजव्या पायाच्या नडगीवर कोयत्याने वार केला तर राहुल अभंगराव याने डोक्यात, डाव्या हाताच्या मनगटावर, अंगठ्यावर कोयत्याने मारून जखमी केले. महादेव अभंगराव याने पूनम यांच्या कानावर हाताने मारले आणि सर्वांनी मिळून शिवीगाळ केली. दमदाटी करून जीवे मारण्याची धमकीही देण्यात आली. अशा आशयाची फिर्याद पूनम कोरे यांनी पंढरपूर शहर पोलिसात दिली आहे. या फिर्यादीवरून पोलिसांनी पाच जणांच्या विरोधात गुन्हा दाखल केला आहे. 


या पाच संशयित आरोपीमधील महादेव भोलेनाथ अभंगराव यांनीही नवनाथ कोरे आणि पूनम कोरे यांनी आपल्यावर कोयत्याने हल्ला केल्याची तक्रार पोलिसात दिलेली आहे. अभंगराव हे देखील जखमी असून त्यांना उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. परस्परविरुद्ध देण्यात आलेल्या फिर्यादीत दोन्ही बाजूनी कोयत्याचा वापर करण्यात आल्याचे म्हटले आहे.  लखुबाई मंदिर परिसरात 'कोयता विरुद्ध कोयता' असाच संघर्ष सुरु झाला असल्याचे दिसत आहे.    


वाचा :>> पंढरीत तरुणाने घेतला गळफास !    






कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

आपल्या प्रतीसादाबद्धल धन्यवाद !