BREAKING

✪ ✪ ✪➤ ✪➤ ✪➤ . ✪ ✪➤ ✪➤ . ✪➤

२७ जाने, २०२२

मास्कशिवाय कुत्री मांजरं जगतात मग आम्ही का मास्क वापरायचा ?




ठाणे : कुत्र्यामांजरासारखे प्राणी मास्कशिवाय निरोगी राहतात तर बुद्धिमान असलेला माणूस जगण्यासाठी मास्क लावतोय ही शोकांतिका असल्याचे सांगत व्यापाऱ्यांनी थेट मोर्चाच काढला आहे. 


गेल्या दोन वर्षांपासून जगभर कोरोनाचा उद्रेक पाहायला मिळाला आहे. माणसांचं जगणं कठीण केलेल्या या कोरोनाने मरणं देखील कठीण केलं. माणसाला घरात कैद करून ठेवलच आणि पोट भरण्याचे सारे मार्गही बंद करून टाकले. चालती बोलती आणि धडधाकट माणसं कोरोनाने हिरावून नेली एवढा उद्रेक कोरोनाने केला असतानाही आणि पुन्हा तिसरी लाट आलेली असतानाही अनेक लोक अजूनही गंभीर नसल्याचे रस्त्यारस्त्यावर पाहायला मिळत असते. शासनाने अर्थात अभ्यासकांनी कोरोनाचा अटकाव करण्यासाठी काही निर्बंध घालून दिले आहेत त्यात परस्परातील अंतर आणि मास्कचा वापर एवढ्या सामान्य बाबी आहेत पण त्या देखील पाळल्या जात नाहीत. त्यासाठी देखील सक्ती करावी लागते आणि दंडाची कारवाई करण्याची वेळ प्रशासनावर येते. पण आता ठाण्यातील व्यापारी याच्याही पुढे गेले असून त्यांची अजब दावा करीत मास्कच्या वापराविरोधात रस्त्यावर उतरून मोर्चा काढला आहे आणि मास्कला विरोध केला आहे. 


कोरोनाची तिसरी लाट आणि ओमीक्रॉनचा शिरकाव यामुळे शासनाने पुन्हा निर्बंध आणि नियम लागू केले आहेत. हे नियम पाळण्याचे आवाहन सातत्याने केले जात असून नियमांचे पालन न करणाऱ्यास दान केला जात आहे पण ठाण्यातील व्यापाऱ्यांचे अजब तर्कट समोर आले आहे. आम्ही मास्क घालणारच नाही अशा भूमिकेवर हे व्यापारी उतरले आहेत. त्यासाठी त्यांनी मोर्चा देखील काढला आणि मास्कचा विरोध केला आहे. कोरोनाच्या काळात अगणित माणसांना कोरोनाची लागण होऊन त्यांचे प्राण गेले आणि आजही जात आहेत पण कुत्र्या मांजरासारखे प्राणी विनामास्क राहूनही या काळात त्यांना काही झाले नसल्याचा दाखला हे व्यापारी देऊ लागले आहेत. कुत्रा, मांजरासारखे प्राणी मास्क न वापरता निरोगी राहू शकतात, माणूस तर बुद्धिमान प्राणी आहे तरीही तो जगण्यासाठी मास्क लावतो आहे ही शोकांतिका आहे असे या व्यापाऱ्यांचे मत आहे. 


मास्कच्या विरोधात व्यापाऱ्यांनी मोर्चा तर काढलाच पण या मोर्चात सहभागी झालेल्या व्यापाऱ्यांनी यावेळी मास्क वापरला नव्हता. आंदोलकांनी सरकार विरोधी घोषणा तर दिल्याच पण कोरोना नियमांना विरोध देखील दर्शविला.

 


शासनाने मास्क सक्तीचा केल्याने आणि दुकानात विनामास्क व्यक्ती आढळल्यास १० हजार रुपयांचा दंड आकाराला जात आहे त्यामुळे व्यापारी संतप्त आहेत. असा दंड आकाराने चुकीचे असल्याचे व्यापाऱ्यांचे मत आहे. ग्राहक मास्क वापरात नसेल यात दुकानदारांची काही चूक नाही. सर्दी, खोकला असेल तर त्या लोकांनी मास्क घातला पाहिजे असा केंद्राचा नियम आहे. लस घेण्याबाबत सक्ती करता येत नाही याबाबत केंद्र शासनाने न्यायालयात प्रतिज्ञापत्र सादर केले आहे.  असे असताना लोकांना बळजबरी का केली जात आहे असा सवाल या व्यापाऱ्यांनी केला असून सरकारने अशीच सक्ती केली तर प्रसंगी न्यायालयात दाद मागू असा पवित्रा व्यापाऱ्यांनी घेतला आहे.       

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

आपल्या प्रतीसादाबद्धल धन्यवाद !