BREAKING

✪ ✪ ✪➤ ✪➤ ✪➤ . ✪ ✪➤ ✪➤ . ✪➤

२७ जाने, २०२२

आगामी २४ तासात थंडी आणखी वाढणार !

 



मुंबई : कडाक्याच्या थंडीने महाराष्ट्र गारठला असतानाच पुढील २४ तासात थंडीचा कडाका आणखी वाढणार असल्याची माहिती हवामान विभागाने दिली आहे. 


महाराष्ट्र गेल्या चार दिवसापासून थंडीने गारठला आहे. खेडोपाडी शेकोट्या पेटू लागल्या असून अंगावरचे उबदार कपडे दिवसभर देखील अंगावर राहू लागले आहेत आणि उबदार कपड्यांचा बाजार पुन्हा गरम होताना दिसत आहे. हिवाळ्याचा हा अखेरचा टप्पा असताना थंडीचा कडाका वाढत निघाला आहे. सद्याच महाराष्ट्र पुरता गारठून गेला असला तरी आगामी २४ तास आणखी जादा थंडीचे जाणार आहेत. पुढील चोवीस तासात तापमानात आणखी घट होणार असून राज्यात थंडी आणखी वाढणार असल्याचा अंदाज हवामान विभागाने व्यक्त केला आहे. 


मागील चोवीस तासात बुलढाणा आणि नागपूर येथील तापमान ९ अंश सेल्सियस पर्यंत खाली आले आणि पुढच्या दोन दिवसात राज्यात विदर्भ, मराठवाडा, उत्तर मध्य महाराष्ट्र आणि गुजराथ राज्यात थंडीची लाट येण्याची शक्यता हवामान विभागाने व्यक्त केली आहे. महाराष्ट्रासह पंजाब, हरियाणा, चंदीगड, दिल्ली, उत्तर राजस्थान, मध्य प्रदेश, ओरिसा, छत्तीसगड या राज्यातही पुढील तीन ते चार दिवस कडाक्याची थंडी पडणार आहे. महाराष्ट्राचे अनेक जिल्हे अधिक प्रमाणात गारठले असून पश्चिमी चक्रवातामुळे ही थंडी पडली असल्याची माहिती हवामान विभागाकडून देण्यात आली आहे. 


राज्यात सलग तिसऱ्या दिवशी गारठा असून नंदुरबार जिल्हयात थंडीची लाट कायमच आहे. राज्याच्या अनेक भागात मागील चोवीस तासात अत्यंत कमी तापमानाची नोंद झाली असून उत्तर मध्य महाराष्ट्रात नंदुरबार, धुळे, जळगाव,पुणे, नगर, नाशिक तसेच मराठवाड्यात औरंगाबाद परभणी, जालना, बीड येथे थंडीची लाट राहिली. या जिल्ह्यातच आगामी चोवीस तासात तापमानात आणखी घसरण होणार होऊ शकते.  विदर्भात तर निचांकी तापमान नोंदण्यात आले असून येथे पुढील २४ तास कडाक्याच्या थंडीच्या लाटेचे असणार आहेत.  उत्तर महाराष्ट्र, विदर्भ आणि मराठवाड्यातील किमान तापमान १० अंश सेलियास राहील आणि दिवसा देखील हवेत मोठा गारठा राहील अशी शक्यता हवामान विभागाने व्यक्त केली आहे. 


हे देखील वाचा : मास्कशिवाय कुत्री मांजरं जगतात मग माणूस का नाही ?


 

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

आपल्या प्रतीसादाबद्धल धन्यवाद !