BREAKING

✪ ✪ ✪➤ ✪➤ ✪➤ . ✪ ✪➤ ✪➤ . ✪➤

२७ जाने, २०२२

चोराची भलतीच हिम्मत , मंत्र्यांच्या शेतातल्या शेळ्या चोरल्या !



जायकवाडी : चोरांची हिम्मत आता भलतीच वाढलेली दिसत असून त्यांनी  माजी मुख्यमंत्री आणि विद्यमान सरकारमधील मंत्री अशोक चव्हाण यांच्या शेतात चोरी काण्याचे अजब धाडस दाखवले आहे.


अलीकडे चोरीच्या एकेक घटना पहिल्या तर चोर आता कुणाचाच मुलाहिजा ठेवत नसल्याचे दिसत आहे. पोलीस अधिकाऱ्यांच्या घरात शिरून चोरी करून चोर पसार होतात. न्यायाधीशांच्या घरी जाऊन चोरी करतात अशा अनेक घटना यापूर्वीही समोर आलेल्या आहेत पण आता तर चक्क राज्याचे माजी मुख्यमंत्री, कॉंग्रेसचे नेते आणि विद्यमान राज्य सरकारमधील मंत्री अशोक चव्हाण यांच्या शेतात जाऊन चोरांनी शेळ्या चोरून नेल्याची घटना घडली आहे. कातपूर शिवारात नामदार अशोक चव्हाण यांची शेती आहे. त्यांच्या शेतात गेल्या वीस वर्षांपासून गणेश अभंग हे शेतमजुरी करीत आहेत. या शेतातील घरातच या मजुराचे कुटुंब रहात आहे. घरांच्या मागच्या बाजूलाच जनावरे बांधण्यासाठीचा एक गोठा आहे. याच गोठ्यातून अभंग यांच्या तीन शेळ्या अज्ञात चोरट्यांनी चोरुन नेल्या आहेत. याप्रकरणी अभंग यांनी एमआयडीसी पैठण पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.   


 औरंगाबाद - पैठण रस्त्यावर असलेल्या प्लॉटवर बांधकाम सुरु असल्यामुळे गणेश अभंग हे बांधकामावर झोपण्यासाठी गेला होता. सकाळी घरी आल्यावर त्याला घराच्या मागे बांधलेल्या शेळ्या दिसून आल्या नाहीत त्यामुळे त्याने आजूबाजूला शोधाशोध केली परंतु त्या कुठेच दिसल्या नाहीत. दरम्यान याच परीसार्तातील एका शेतातील वस्तीवर चोरट्यांनी हात मारला असल्याची माहिती अभंग यांना मिळाली. या वस्तीवर चोरांनी ऊसतोड कामगारांचे मोबिल चोरून नेल्याची घटना घडल्याचे समोर आले त्यामुळे आपल्याही दोन शेळ्या आणि एक पाट याच चोरांनी चोरून नेली असल्याची खात्री अभंग यांना झाली आणि मग त्यांनी पोलिसात धाव घेतली. पोलिसांनी अज्ञात चोरट्याविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. झालेल्या चोरीपेक्षा चोरांनी कुठे हात घालण्याची हिम्मत केली याचीच चर्चा परिसरात रंगली आहे. 


कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

आपल्या प्रतीसादाबद्धल धन्यवाद !