BREAKING

✪ ✪ ✪➤ ✪➤ ✪➤ . ✪ ✪➤ ✪➤ . ✪➤

२७ जाने, २०२२

नितेश राणे यांना अटकपूर्व जामीन नेण्यास सर्वोच्च न्यायालयाचा नकार !

 


नवी दिल्ली  : गेल्या काही दिवसांपासून चर्चेत असलेल्या भाजप आमदार नितेश राणे यांच्या जामीन अर्ज मुंबई सर्वोच्च न्यायालयाने देखील फेटाळला आहे त्यामुळे नितेश राणे आणि केंद्रीय मंत्री  नारायण राणे यांना हा मोठा धक्का आहे. 


संतोष परब हल्ला प्रकरणात नितेश राणे यांना पोलिसांनी बोलावले असता दोन वेळा ते हजर राहिले पण नंतर मात्र त्यांनी पोलिसात हजर राहण्याऐवजी अज्ञातवासात जाणे पसंत केले होते. त्यांच्या अटकेसाठी पोलीस शोध घेत राहिले पण राणे यांनी उच्च न्यायालयात अटकपूर्व जामीन मिळविण्यासाठी अर्ज दाखल  केला होता. या अर्जावर प्रदीर्घ सुनावणी झाली आणि न्यायालयाने त्यांचा अटकपूर्व जामीन अर्ज फेटाळला. त्यानंतर आता सर्वोच्च न्यायालयानेही त्यांचा अटकपूर्व जामीन नाकारला आहे आणि दहा दिवसांचे सरंक्षण दिले आहे.  त्यामळे त्यांच्यावर अटकेची टांगती तलवार कायम आहे. 


संतोष परब यांच्यावरील प्राणघातक हल्ल्याप्रकरणी सिंधुदुर्ग न्यायालयाने यापूर्वीच नितेश राणे यांचा अटकपूर्व जामीन फेटाळून लावला  होता. त्यामुळे नितेश राणे यांनी मुंबई उच्च न्यायालयात धाव घेतली होती पण आता तेथेही त्यांचा अटकपूर्व जामीन नाकारण्यात आला असून आता त्यांना सर्वोच्च न्यायालयात देखील त्यांना अटकपूर्व जामीन मिळू शकला नाही. शिवसेनेचे मंत्री आदित्य ठाकरे यांची नक्कल केल्यामुळे जाणीवपूर्वक षडयंत्र रचण्यात आल्याचा आरोप केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी केला होता पण आता सर्वोच्चन्यायालयानेही नितेश राणे यांना अटकपूर्व जामीन देण्यास नकार दिला आहे. दहा दिवसांचा दिलासा दिला असला तरी अटकपूर्व जामीन देण्यास सर्वोच्च न्यायालयाने नकार दिला आहे. दहा दिवसात शरण येण्याचे आदेश सुप्रीम कोर्टाने राणे यांना दिले आहेत. 


आ. नितेश राणे यांना आता कनिष्ठ न्यायालयात जाऊन नियमित जामिनासाठी अर्ज करावा लागणार आहे. तोपर्यंत म्हणजे दहा दिवस राणे यांना अटकेपासून संरक्षण देण्यात आले आहे. त्यामुळे आता नितेश राणे यांच्यावर पुन्हा एकदा अटकेची टांगती तलवार कायम आहे. 

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

आपल्या प्रतीसादाबद्धल धन्यवाद !