BREAKING

✪ ✪ ✪➤ ✪➤ ✪➤ . ✪ ✪➤ ✪➤ . ✪➤

२७ जाने, २०२२

रश्मी ठाकरे यांनी राष्ट्रध्वजाचा अवमान केला तर अमृता फडणवीस यांनी ?

 



मुंबई : मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या पत्नी रश्मी ठाकरे यांनी राष्ट्रध्वजाचा अवमान केल्याची तक्रार होताच देवेंद्र फडणवीस यांच्या पत्नी अमृता फडणवीस यांचा एक फोटो व्हायरल होऊ लागला आहे.  समाज माध्यमांवर दोन्ही फोटो टाकून जाम खेचाखेची सुरु झाली आहे. 



भारतीय प्रजासत्ताक दिनाच्या दिवशी वर्षा या मुख्यमंत्र्यांच्या निवासस्थानी प्रांगणात मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले. यावेळी राष्ट्रध्वजाचा अवमान झाला असल्याची तक्रार ऍड. जयश्री पाटील यांनी पोलीस आयुक्त यांच्याकडे केली.  राष्ट्रगीत झाल्यानंतर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे हे दोघेही राष्ट्रध्वजाला सलामी देत आहेत पण रश्मी ठाकरे या सलामी देत नाही. त्या केवळ उभ्या होत्या. त्यांनी राष्ट्रध्वजाला सलामी का दिली नाही ? असा सवाल ऍड पाटील यांनी उपस्थित केला आणि त्यांना संविधान मान्य नाही का ? त्यांच्या या कृत्यामुळे राष्ट्रध्वजाचा अवमान झाला आहे तसेच लोकांच्या भावना दुखावल्या आहेत असं म्हणत ऍड जयश्री पाटील यांनी पोलीस आयुक्त यांच्याकडे तक्रार केली आहे. 


ऍड पाटील यांनी ही तक्रार केल्यानंतर विरोधकांनी ते छायाचित्र व्हायरल करीत बरीच मुक्ताफळे उधळली. ठाकरे कुटुंबाचे ते छायाचित्र व्हायरल केले जात असतानाच दुसरेही एक छायाचित्र व्हायरल होऊ लागले. नेटकऱ्यानी २०१७ सालचे, देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री असतानाचे असेच छयाचित्र समोर आणले आणि अनेकांची बोलतीच बंद झाली. या छायाचित्रात २०१७ साली स्वातंत्र्य दिन साजरा करताना तत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि त्यांच्या पत्नी अमृता फडणवीस दिसत आहेत. 


मुख्यमंत्री म्हणून देवेंद्र फडणवीस हे राष्ट्रध्वजास मानवंदना देताना दिसत आहेत पण त्यांच्या पत्नी अमृता फडणवीस हे कन्येसोबत फक्त उभ्या आहेत. त्यांनीही राष्ट्रध्वजास सलामी दिलेली नाही. असे चित्र समोर आणून 'नहेले पे दहेला' अशी बाजी मारली आहे. महाविकास आघाडी आणि भाजप कार्यकर्त्यात धम्माल 'डाव प्रतिडाव' नाट्य रंगले आहे. ' त्यावेळी अमृता फडणवीस यांनी कुठे राष्ट्रध्वजाला सलामी दिली होती ?' असा सवाल रश्मी ठाकरे यांच्याकडे बोट दाखविणाऱ्याना विचारला आहे. भाजप आणि सेनेच्या कार्यकर्त्यात धम्माल खेचाखेची रंगली आहे.           



कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

आपल्या प्रतीसादाबद्धल धन्यवाद !