मुंबई : कोरोनाच्या काळात अत्यंत महत्वाची भूमिका बजावलेल्या कोरोनापासून आता महाराष्ट्राची सुटका होण्याची शक्यता असून त्या दृष्टीने आजच्या मंत्रीमंडळ बैठकीत चर्चा झाली आहे.
कोरोनाचा प्रादुर्भाव सुरु झाल्यापासून शासनाने चेहऱ्यावर मास्क लावणे सक्तीचे केले आहे. मास्क नसेल तर त्याला दंड आकारण्याची तरतूद करण्यात आली आहे. आता तिसरी लाट सुरु असून कोरोनाचा वेगाने प्रसार होत आहे पण राज्य शासन महाराष्ट्र मास्क मुक्तीचा विचार करीत आहे. युरोप, इंग्लंड, फ्रांस तसेच अनके देशांनी आता मास्क न वापरण्याची भूमिका घेतलेली आहे त्याप्रमाणे महाराष्ट्रात देखील विचार सुरु झाला असल्याचे दिसत आहे. मास्क न वापरण्याची भूमिका काही देशांनी घेतली असल्याने तशी भूमिका घेता येईल काय ? याबाबत मंत्रीमंडळाच्या बैठकीत आज चर्चा झाली आहे. याबाबत शासन टास्क फोर्स सोबत चर्चा करणार आहे आणि टास्क फोर्सच्या निर्णयानंतरच मास्क बाबत धोरण जाहीर केले जाणार आहे. कोरोनाच्या चौथ्या आणि पाचव्या लाटेची शक्यता असल्याने सखोल अभ्यास करूनच याबाबत निर्णय घेतला जाईल.
कोरोना प्रतिबंधात्मक लस निर्माण झाल्यानंतर मोठ्या प्रमाणात लसीकरण करण्यात येत आहे. लसीकरणाची मोहीम जगभर राबविण्यात येत आहे. काही देशांनी वेगाने लसीकरण पूर्ण केले असून तेथे कठोर निर्बंध हटविण्यात आले आहेत तसेच मास्कपासून मुक्ती देण्यात आली आहे. आज राज्यमंत्रीमंडळाच्या बैठकीत याबाबत चर्चा सुरु झाल्याने राज्यात देखील अशी सुटका होण्याची शक्यता आज निर्माण झाली आहे. मास्कपासून सुटका होण्याची महाराष्ट्राला प्रतीक्षा आहे. मंत्रीमंडळाच्या बैठकीत अशी कुठलीही चर्चा झाली नसल्याचे उच्च शिक्षण मंत्री उदय सामंत यांनी सांगितले. मास्क हा आवश्यकच असल्याने तो वापरावाच लागेल असे देखील ते म्हणाले आहेत. आता टास्क फोर्सच्या बैठकीत काय निर्णय होतोय याकडे महाराष्ट्राचे लक्ष लागले आहे.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा
आपल्या प्रतीसादाबद्धल धन्यवाद !