खाकी वर्दीचे पाशवी कृत्य !
पुणे : कायद्याचे रक्षण करणाऱ्या पोलिसाने गुन्हेगाराला शिक्षेपर्यंत पोहोचविणाऱ्या वकील महिलेवरच बलात्कार केल्याची धक्कादायक आणि तितकीच खळबळजनक घटना समोर आल्याने पोलिसात आणि न्यायालयीन वर्तुळात हादरा बसला आहे.
गुन्हेगारावर वचक ठेवण्याऐवजी पोलिसाचा आरोपीच्या पिंजऱ्यात उभे राहू लागले आहेत. अनेक गुन्ह्यात पोलिसांचा सहभाग असतो हे अनेकदा आणि सातत्याने दिसून येत आहे पण पुणे पोलिसातील एका महाभाग पोलिसाने तर यावरही कडी केली आहे आणि चक्क एका पोलिसानेच बलात्कार केल्याची फिर्याद एका महिला वकिलानेच दिल्याने अनेकांना धक्का बसला आहे तर सामान्य लोकही तोंडात बोट घालू लागले आहेत. पुणे ग्रामीण पोलीसा विभागातील एका पोलीस कर्मचाऱ्याने २९ वर्षे वयाच्या एका महिला वकिलावर बलात्कार केल्याचा गुन्हा चतु:श्रुंगी पोलीस ठाण्यात दाखल झाला आहे.
पोलीस सेवेत असलेल्या या आरोपीने पिडीत वकील महिलेस लग्नाचे आमिष दाखवले आणि तिच्याशी वारंवार संबध ठेवले. पोलीस कर्मचारी लक्ष्मण गंगाधर राऊत हा ३३ वर्षीय पोलीस पाषाण परिसरातील पत्रा चाळ येथे रहात असून तो पुणे ग्रामीणच्या एटीएस सेलमध्ये कार्यरत आहे. मुळचा तो पुणे जिल्ह्यातील लोणी काळभोर येथील रहिवाशी आहे. पोलिसाकडून मिळालेल्या माहितीनुसार आरोपी पोलीस कर्मचारी राऊत याची मेट्रोमोनिअल साईटवरून या वकील महिलेशी ओळख झाली आणि संकेतस्थळावरून संवाद झाल्यानंतर त्याने पिडीत वकील महिलाच मोबाईल क्रमाक घेतला. मोबाईलवरून संवाद साधत या आरोपीने वकील महिलेशी ओळख वाढवली आणि त्यानंतर त्याने लग्नाचे आमिष देत पिडीत महिलेचे लैंगिक शोषण केले.
सदर वकील महिलेस आरोपी असलेल्या पोलीस कर्मचाऱ्याने देहू रोड, पिंपळे निलख परिसरातील विविध लॉजवर नेले आणि तिच्यावर अनेकदा बलात्कार केला. जवळपास पावणे दोन वर्षे या महिलेशी लैंगिक संबध ठेवल्यानंतर आरोपीने लग्नाला नकार देऊन तिची फसवणूक केली. आपली फसवणूक केल्याचे लक्षात आल्यावर वकील महिलेने पुण्याच्या चतु:शृंगी पोलीस ठाण्यात धाव घेतली आणि पोलीस कर्मचारी लक्ष्मण राऊत याच्या विरोधात तक्रार दाखल केली.
सदर महिलेच्या तक्रारीवरून पोलिसांनी पोलीस कर्मचारी राऊत याच्या विरोधात बलात्कारासह अन्य कलमान्वये गुन्हा दाखल केला आहे. या प्रकरणी पोलीस अधिक तपास करीत आहेत. या घटनेची माहिती पूर्ण पुणे पोलीस दलात पसरली आणि पोलीसानाही हादरा बसला. न्यायालयाच्या वर्तुळातही या घटनेची चर्चा सुरु झाली असून त्या पोलीसाबाबत प्रचंड संतप्त प्रतिक्रिया उमटू लागल्या आहेत. पोलीस दलाला शरमेने मान खाली घालण्याची वेळ या राऊतने आणली असल्याने पोलिसात देखील त्याच्याबंद्ध्ल संताप व्यक्त होत आहे.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा
आपल्या प्रतीसादाबद्धल धन्यवाद !