BREAKING

✪ ✪ ✪➤ ✪➤ ✪➤ . ✪ ✪➤ ✪➤ . ✪➤

४ जाने, २०२२

-- तर सोलापूर जिल्ह्यातील शेतकऱ्यांना मिळणार नाही अकरावा हप्ता !

 


अपात्र शेतकरीही घेतात लाभ !




सोलापूर : इ केवायसी पूर्ण केले नसलेल्या सोलापूर जिल्ह्यातील शेतकऱ्यांना किसान सन्मान योजनेचा पुढचा हप्ता मिळणार नसल्याची माहिती सोलापूर निवासी उप जिल्हाधिकारी शमा पवार यांनी सांगितले असून लाभार्थ्यांनी ही प्रक्रिया वेळीच पूर्ण करावी असे आवाहन त्यांनी केले आहे.


पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी लोकसभेच्या निवडणुकीपूर्वी शेतकरी सन्मानार्थ दरवर्षी सहा हजार रुपये देण्यासंदर्भात एक घोषणा केली होती. ही सहा हजाराची रक्कम दरवर्षी तीन हप्त्यात दिली जाते. पंतप्रधान यांच्या या घोषणेची अंमलबजावणी सुरु आहे. नुकतेच नववर्षाच्या पहिल्याच दिवशी पंतप्रधान मोदी यांच्या हस्ते दहाव्या हप्त्याचे वितरण करण्यात आले आहे. संपूर्ण देशात ही योजना अमलात आलेली असून लाभार्थी शेतकरी वर्ग याची प्रतीक्षा करीत असतो. शेतकऱ्याच्या सन्मानार्थ हा लाभ देण्यात येतो पण या योजनेत काही गैरप्रकार घडत असल्याची बाब समोर आली आहे. असे गैरप्रकार टाळण्यासाठी e- kyc (इ केवायसी) बंधनकारक करण्यात आली आहे. वास्तविक दहावा हप्ता देण्यापुर्वीचा हा विषय ऐरणीवर आला होता परंतु सवलत देण्यात आली. यापुढे मात्र विना इ केवायसी शिवाय पुढचा म्हणजे अकरावा हप्ता दिला जाणार नाही.

  


लाभार्थी पात्र शेतकरी बांधवांसाठी ही योजना कार्यान्वित करण्यात आली परंतु या योजनेचा काही अपात्र व्यक्तींनीही लाभ घेतला. नियमबाह्य शेतकऱ्यांनी या योजनेचा लाभ घेतला असून अशा शेतकऱ्यांची संख्या मोठी आहे. अशा व्यक्तींची एक यादी तयार करून त्यांच्या फोन क्रमांकासह ती ग्रामपंचायत कार्यालयात लावण्यात आली होती. अपात्र असताना लाभ घेतलेल्यानी  सदर रक्कम महसूल आणि कृषी अधिकारी यांच्याकडे जमा करण्याबाबत आदेशही देण्यात आले होते, त्यानुसार बहुसंख्य अपात्र व्यक्तींनी ही रक्कम परत केली आहे आणि त्यांना दहाव्या हप्त्याचा लाभ देखील मिळाला नाही. असे प्रकार होत असल्यामुळे आणि पारदर्शकता राहावी यासाठी इ केवायसी चा पर्याय निवडण्यात आला आहे.        


लाभार्थी शेतकर्यांनी ३१ मार्च पूर्वी  इ केवायसी प्रक्रिया पूर्ण करावी असे आवाहन सोलापूर निवासी उप जिल्हाधिकारी शमा पवार यांनी केले आहे. पीएम किसान ऍप द्वारे मोफत करता येणार आहे. सोलापूर जिल्ह्यातील पात्र शेतकऱ्यांना ही प्रक्रिया पूर्ण करण्यासाठी मोबाईलवर ओटीपी किंवा ग्राहक सेवा केंद्रावर बायोमेट्रिक असे पर्याय उपलब्ध करून देण्यात आलेले आहेत. सर्व तहसीलदारानाही तशा सूचना देनाय्त आल्या असून मोहीम राबवून ३१ मार्च पूर्वी केवायसी प्रक्रिया पूर्ण करण्यास सांगितले आहे. 


वाचा : येथे क्लिक करा > कोरोना निर्बंधाचे फास आवळू लागले ! 

 







कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

आपल्या प्रतीसादाबद्धल धन्यवाद !