पंतप्रधानांच्या सुरक्षेत चूक !
नवी दिल्ली : पंतप्रधान सभेला जाण्याऐवजी परत विमानतळावर आले आणि तेथील अधिकाऱ्यांना म्हणाले, 'अपने सी एम को थँक्स कहना, मै भटिंडा एअरपोर्ट तक जिंदा लौट पाया !' पंतप्रधानांच्या दौऱ्यात कधीही ना घडणारी घटना आज घडली आहे.
पंजाबमधील फिरोजपूर येथे आज पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची सभा आयोजित केली पण ही सभा ऐनवेळी रद्द करण्यात आली. पंतप्रधान नरेंद्र मोदी हे या सभेसाठी दाखल झाले होते. विमानतळावरून ते सभास्थळाकडे निघाले असता त्यांचा ताफा एका फ्लायओव्हरवर अडकला. पंधरा ते वीस मिनिटे त्यांना तेथेच अडकून पडावे लागले. त्यानंतर मात्र सुरक्षेच्या कारणावरून त्याना परत भटिंडा विमानतळावर जावे लागले. तेथे पोहोचल्यानंतर ते तेथील अधिकाऱ्यांना काय म्हणाले याबाबतची माहिती एएनआय या वृत्तसंस्थेने दिली आहे.
फिरोजपूर येथील सभेसाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी जात असताना काही आंदोलकांनी त्यांचा रस्ता रोखला. हुसैनीवाला येथील राष्ट्रीय शाहिद स्मारकापासून सुमारे ३० किमी अंतरावर पंतप्रधान मोदी यांचा ताफा पोहोचल्यानंतर अचानकपणे काही आंदोलक समोर आले आणि त्यांनी ताफा अडवला त्यामुळे मोदी त्यांना पंधरा वीस मिनिटे अडकून पडावे लागले आणि तेथून परत विमानतळा वर जावे लागले . पंतप्रधान यांच्या सुरक्षेतील ही फार मोठी चूक होती असे गृहमंत्रालयाने म्हटले आहे.
पंतप्रधान मोदी यांचीं नियोजित सभा तर झालीच नाही पण रस्त्यात पंधरा वीस मिनिटे अडकून पडल्यावर त्यांना सुरक्षेच्या कारणासाठी परत जावे लागले. अशावेळी सगळ्याच यंत्रणांचा गोंधळ उडणे स्वाभाविक आहे परंतु एएनआय च्या वृत्तानुसार पंतप्रधान भटिंडा विमान तळावर गेल्यानंतर तेथील अधिकाऱ्यांना म्हणाले. 'तुमच्या मुख्यमंत्र्यांना धन्यवाद सांगा, मी भटिंडा विमानतळापर्यंत जिवंत परंतु शकलो !'
पंतप्रधान यांच्या दौऱ्यातील अशी चूक प्रथमच घडली आहे. याबाबत भारतीय जनता पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष जे पी नड्डा यांनी तीव्र संताप व्यक्त केला असून ' मतदारांच्या हातून पराभवाच्या भीतीने पंजाबमधील काँग्रेस सरकारने पंजाबमधील पंतप्रधान मोदीजींच्या कार्यक्रमांना हाणून पाडण्यासाठी शक्य त्या सर्व संभाव्य युक्त्या वापरल्या' असे ट्विट त्यांनी केले आहे.
सातशे लोक आले होते !
पंजाबचे मुख्यमंत्री चरणजित चन्नी यांनी मात्र याबाबत वेगळीच माहिती दिली आहे. सगळे आरोप फेटाळून लावत त्यांनी सभेसाठी ७० हजार खुर्च्या ठेवलेल्या होत्या पण फक्त ७०० लोक सभेला आले होते असे पंजाब वाहिनीवरील मुलखतीत सांगितले. सुरक्षेत कसलीही चूक नव्हती, पंतप्रधान ज्या मार्गाने जाणार होते त्याबाबतच्या आराखड्याची योजना अखेरच्या क्षणी बनविण्यात आली. त्यांना हेलिकॉप्टरने जायचे होते आणि आपण त्यांच्या सुरक्षा व्यवस्थेवर रात्री उशिरापर्यंत काम करीत होतो असेही त्यांनी सांगितले आहे.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा
आपल्या प्रतीसादाबद्धल धन्यवाद !