BREAKING

✪ ✪ ✪➤ ✪➤ ✪➤ . ✪ ✪➤ ✪➤ . ✪➤

१७ जाने, २०२२

पंढरपूर शहरात दोन पिस्तुलधारी पकडले !

 



पंढरपूर : पंढरपूर शहरात दोन पिस्तुलधारी पकडण्यात पोलिसांना मोठे यश आले असून पिस्तुल बाळगण्यात त्यांचा काय हेतू होता आणि हे पिस्तुल कोठून प्राप्त केले आहेत याचा तपास पोलीस करू लागले आहेत.


पंढरपूर शहराला मोठी गुन्हेगारी पार्श्वभूमी आहेच पण अलीकडे देवाचे हे गाव शांत झाले असतानाच आजची मोठी घटना उघडकीस आली असून पंढरपूर शहरात खळबळ उडाली आहे. १५ जानेवारी रोजी सायंकाळी पंढरपूर शहरातील रिद्धी सिद्धी मंदिर येथे अजय खाडे नावाचा व्यक्ती कमरेला पिस्तुल लावून थांबलेला आहे अशी माहिती पोलीस निरीक्षक अरुण पवार यांना मिळाली, या माहितीच्या आधारे त्यांनी गुन्हे प्रकटीकरण शाखेचे अधिकारी आणि त्यांच्या टीमला याबाबत कारवाई करण्याचे आदेश दिले.  पोलिसांनी त्याला गाठून त्याला तपासले असता त्याच्या कमरेला एक गावठी बनावटीचे पिस्तुल आढळून आले. सदर पिस्तुल पोलिसांनी जप्त केले आहे. 


त्यानंतर १६ जानेवारीस कॉलेज रोडवरील  श्रीकृष्ण हॉटेल परिसरात  गणेश शिंदे नावाचा एक व्यक्ती कमरेला पिस्तुल लावून फिरत असल्याची माहिती पोलिसांना मिळाली, त्या माहितीनुसार गुन्हे प्रकटीकरण शाखेच्या पथकाने त्याठिकाणी जाऊन सदर व्यक्तीस ताब्यात घेण्यात आले. त्याची तपासणी केली असता त्याच्या कमरेला एक गावठी बनावटीचे पिस्तुल आणि दोन काडतूस आढळून आले आहेत. भारतीय हत्यार कायदा अन्वये दोन्ही आरोपीवर गुन्हा दाखल करून अटक करण्यात आली आहे. दोभी आरोपी हे पंढरपूर शहरातील राहणारे असून त्यांनी कशासाठी आणि कोठून ही शस्त्रे आणली आहेत याची चौकशी करण्यात येत आहे. 


या दोन्ही आरोपीवर यापूर्वी कसलीही गुन्हेगारी पार्श्वभूमी  नाही. त्यांचा हा पहिलाच गुन्हा असल्याची माहिती उप विभागीय पोलीस अधिकारी विक्रम कदम यांनी दिली आहे. तपासात फार काही हाती येण्याची शक्यता तर आहेच पण या आरोपींनी ज्यांच्याकडून हे पिस्तुल मिळवले आहेत त्यानाही लवकरच अटक केली जाईल असे उप विभागीय अधिकारी विक्रम कदम यांनी सांगितले आहे.   


पंढरपूर शहराला अध्यात्मिक परंपरा आहे तसे मोठी गुन्हेगारी पार्श्वभूमी देखील आहे. नंग्या तलवारी या पंढरपूर शहराने पहिल्या आहेत तसे भरदिवसा भर रस्त्यावर खून होताना देखील पाहिले आहेत. अंगावर काटा आणणारी गुन्हेगारी पंढरीत होती पण पोलिसांनी ती मोडून काढली आहे. एक दोन अपवाद वगळता गेल्या काही वर्षात किरकोळ भुरटे दादा सोडले तर पंढरपूर येथे मोठी गुन्हेगारी होत नाही. पंढरपूरकर आता मोकळा श्वास घ्यायला लालेले असतानाच पुन्हा पहिली गुन्हेगारी डोके वर काढतेय की काय अशी भीती आजच्या या घटनेमुळे निर्माण झाली आहे.  आज गावठी बनावटीच्या पिस्तुलासह पकडलेले दोन्ही आरोपी हे पंढरपूर येथील स्थानिक आहेत.  


गावठी आणि बेकायदेशी पिस्तुल घेवून हे कुणाला 'लक्ष्य' करणार होते ? या आरोपींचे नेमके नियोजन काय होते ? दोघांनी कुणाकडून हे गावठी कट्टे उपलब्ध केले आहेत या सगळ्यांचा छडा आता पोलिसांच्या तपासात लागणार आहेच पण या घटनेने नाही म्हटले तरी शहरात चिंतेचे वातावरण निर्माण झाले आहे , यांना नेमका कुणाचा 'गेम' करायचा होता ? हा प्रश्न नागरिकांना पडणे स्वाभाविक आहे. पोलिसांच्या तपासात मात्र मोठे प्लॅनिंग समोर येण्याची शक्यता आहे.      

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

आपल्या प्रतीसादाबद्धल धन्यवाद !