BREAKING

✪ ✪ ✪➤ ✪➤ ✪➤ . ✪ ✪➤ ✪➤ . ✪➤

७ जाने, २०२२

देवेंद्र फडणवीस यांना उच्च न्यायालयाची नोटीस !

 



मुंबई : राज्याचे माजी मुख्यमंत्री आणि विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांना मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने नोटीस बजावली असून चार आठवड्यात उत्तर देण्यास सांगितले आहे. 


देवेंद्र फडणवीस यांच्या पत्नी अमृता फडणवीस या ऍक्सिस बँकेत सेवेत आहेत आणि फडणवीस यांनी  मुख्यमंत्री असताना सरकारी कर्मचाऱ्यांचे पगार या बँकेत वळविले होते. हा विषय त्या वेळीही प्रचंड गाजला होता. फडणवीस यांच्या आदेशानुसार मुख्य सचिवांनी एक परिपत्रक काढून शासकीय कर्मचाऱ्यांचे मासिक वेतन ऍक्सिस बँकेकडे वळविण्यात आले होते. आधी हे वेतन भारतीय स्टेट बँक तसेच अन्य राष्ट्रीयकृत बँकेतून होत होते पण ही खाती ऍक्सिस बँकेत वळविण्याचे आदेश देण्यात आले होते. अशा प्रकारचा आरोप करणारी फौजदारी स्वरूपाची जनहित याचिका मोहनीश जबलपूरे यांनी उच्च न्यायालयात दाखल केली होती. राज्यतील पोलिसांची खाती आणि संजय गांधी निराधार आवास योजनेच्या लाभार्थ्यांची खाती खाजगी बँकेत उघडण्यास सांगितले होते. देवेंद्र फडणवीस यांच्या पत्नी अमृता फडणवीस याच बँकेत काम करीत असल्यामुळे या प्रकरणाला वेगळेच महत्व आले होते.  


पोलिसांच्या वेतनाची खाती ऍक्सिस बँकेकडे वळती करण्याच्या या प्रकरणी त्यावेळच्या विरोधी पक्षाने सडकून टीका केली होती पण हे प्रकरण न्यायालयात गेल्याने न्यायालयीन प्रक्रिया तर पूर्ण होणारच आहे. त्यानुसार नागपूर खंडपीठाचे न्यायमूर्ती सुनील शुत्रे, अनिल पानसरे याची देवेंद्र फडणवीस यांच्यासह ऍक्सिस बँक, भारतीय स्टेट बँक याना नोटीस बजावली आहे.  या प्रकरणाची सुनावणी यापूर्वीही झाली होती आणि यावेळी न्यायालयाने राज्याचे मुख्य सचिव, गृह विभाग आणि पोलीस महासंचालक याना नोटीस बजावण्यात आली होती. फडणवीस यांनाही ते मुख्यमंत्री असताना नोटीस बजावण्यात आलेली होती परंतु दरम्यान त्यांचा पत्ता बदलला  त्यामुळे न्यायालयाने पत्ता बदलून नव्या पत्त्यावर फडणवीस याना नोटीस देण्यात आली आहे. चार आठवड्यात या प्रकरणी उत्तर देण्याचे आदेश उच्च न्यायालयाने दिले आहेत. 


वाचा : पोलिसदादा करणार आता घरी बसून काम !   





कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

आपल्या प्रतीसादाबद्धल धन्यवाद !