BREAKING

✪ ✪ ✪➤ ✪➤ ✪➤ . ✪ ✪➤ ✪➤ . ✪➤

१२ जाने, २०२२

गोळ्या झाडल्या, सरकारी डॉक्टरांचा अखेर मृत्यू !



यवतमाळ : अज्ञात ह्ल्लेखोरोनी काल गोळ्या झाडलेले शासकीय वैद्यकीय अधिकारी डॉ. हनुमंत धर्मकारे यांचा अखेर मृत्य झाला असून त्यांच्यावर एकूण चार गोळ्या झाडण्यात आल्या होत्या. 


उमरखेड येथील उत्तरवार रुग्णालयाच्या परिसरात डॉक्टर हनुमंत धर्माकारे यांच्यावर गोळीबार झाला. रुग्णांची सेवा करून डॉक्टर रुग्णालयातून घरी निघाले होते. याचवेळी अचानक दुचाकीवरून दोन तरुण आले आणि त्यांनी डॉक्टरांवर बेछूट गोळीबार केला. रुग्णालयाच्या समोरच ही घटना घडली. डॉक्टर धर्मकारे यांना याच रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले. हल्लेखोर मात्र गोळ्या झाडून पळून गेले आहेत. परिसरातील नागरिकांनी दोन हल्लेखोरांना पकडण्याचा प्रयत्न केला परंतु ते दुचाकीवर असल्याने पळून जाण्यात यशस्वी झाले आहेत.  


डॉक्टर धर्मकारे हे एक मन्याच्या सुट्टीवर गेले होते आणि कालच रुग्णालयात हजर झाले होते.कामावर हजर झाल्याची नोंद करून ते बाजूलाच असलेल्या हॉटेलमध्ये चहा घेण्यासाठी बाहेर आले होते आणि याचवेळी दुचाकीवरून आलेल्या हल्लेखोरांनी त्यांच्यावर चार गोळ्या झाडल्या होत्या. यातील तीन गोळ्या त्यांच्या पाठीवर तर एक गोळी त्यांच्या छातीत घुसली आणि याच गोळीने त्यांचा प्राण घेतला. 


गोळीबाराची घटना घडली तेंव्हा आजूबाजूला नागरिकांची वर्दळ होती. हा प्रकार घडताच लोकांनी आरडओरड केली आणि हल्लेखोर पळून जात असताना त्यांना पकडण्याचा प्रयत्नही केला पण ते पळून जाण्यात यशस्वी झाले. पोलिसांनी त्यांना पकडण्यासाठी नाकाबंदी लावली पण त्यातही हे हल्लेखोर सापडू शकले नाहीत. पोलीस त्यांचा कसून शोध घेत आहेत पण डॉक्टर मात्र मृत्युमुखी पडले. रुग्णालयाच्या दारातच त्यांच्यावर गोळ्या झडल्या गेल्या आणि तातडीने त्यांच्यावर उपचार सुरु करण्यात आले पण चार गोळ्या त्यांच्या शरीरात घुसल्याने आणि एक गोळी त्यांच्या छातीत घुसल्याने उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाला. डॉक्टर धर्मकारे हे अत्यंत मनमिळावू असल्यामुळे प्रचंड हळहळ व्यक्त होत आहे. 





कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

आपल्या प्रतीसादाबद्धल धन्यवाद !