सोलापूर : शेतात द्राक्षबागेत पाखरे राखण्यासाठी म्हणून चिमुकल्या दोन मुलीना घेऊन गेलेली आई आपल्या मुलींसह शेततळ्यात बुडून मृत्युमुखी पडल्याची घटना आज घडली आहे.
उत्तर सोलापूर तालुक्यातील मार्डी येथे याच महिन्यात तीन मुली पाण्यात बुडून मृत्युमुखी पडल्या होत्या आणि त्यानंतर लगेच आज ही घटना घडली आहे. उत्तर सोलापूर तालुक्यातील पाथरी येथील शेतात अक्षय ढेकळे यांचे घर आहे, आज दुपारी २२ वर्षे वयाची त्यांची पत्नी सारिका अक्षय ढेकळे आपल्या चार वर्षे वयाची मुलगी गौरी आणि दोन वर्षांची मुलगी आरोही हे मिळून शेतात गेले होते. त्यानंतर तिघेही शेततळ्यात बुडून मृत्युमुखी पडलेल्या अवस्थेत आढळून आले. या घटनेने परिसरात खळबळ उडाली असून पोलिसांनी घटनेचा पंचनामा केला आहे.
अपघात की
आत्महत्या ?
बावीस वर्षे वयाच्या सारिका आपल्या दोन मुलींचा घेऊन शेततळ्यात जाण्याचे कारण नव्हते. शेतातच घर असल्यामुळे पाणी पिण्यासाठी जाण्याचे काही कारण नव्हते. शिवाय आई आपल्या एवढ्या लहान मुलीना घेऊन शेततळ्यात कशाला जाईल हा प्रश्न उपस्थित होत आहे. सदर घटना हा अपघात आहे की आत्महत्या आहे या दिशेनेही पोलीस चौकशी करीत आहेत. मृतदेह शवचिकित्सेसाठी पाठविण्यात आले असून या घटनेने उत्तर सोलापूर तालुक्यासह सोलापूर जिल्हा पुन्हा एकदा हादरला आहे. काही दिवसापूर्वी तीन मुलींचा शेततळ्यात झालेला मृत्यू हा देखील याच तालुक्यात झाला होता. तत्पर्वी सांगोला तालुक्यात देखील अशीच घटना घडली होती. सखोल तपासानंतर मृत्यूचे नेमके कारण समोर येईल असे पोलीस निरीक्षक अरुण फुगे यांनी सांगितले
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा
आपल्या प्रतीसादाबद्धल धन्यवाद !