BREAKING

✪ ✪ ✪➤ ✪➤ ✪➤ . ✪ ✪➤ ✪➤ . ✪➤

३१ जाने, २०२२

पंढरपूर तालुक्यातून अल्पवयीन मुलीचे अपहरण !

 



पंढरपूर : बहिणीच्या बाळंतपणासाठी आलेल्या एका अल्पवयीन मुलीचे पंढरपूर तालुक्यातून अर्ध्या रात्री अपहरण करण्यात आल्याची धक्कादायक आणि तितकीच खळबळजनक घटना घडली आहे.


अपहृत मुलीच्या आईने याबाबत पंढरपूर तालुका पोलीस ठाण्यात फिर्याद दिली असून त्यानुसार रात्री दोन वाजण्याच्या सुमारास पंढरपूर तालुक्यातील एका गावात ही घटना घडली आहे. पंढरपूर तालुक्यातील दोन वेगवेगळ्या गावातील दोन मुलांशी परभणी जिल्ह्यातील दोन बहिणीचा विवाह झाला होता. यातील एका मुलीच्या बाळंतपणासाठी तिची तिसरी बहिण आलेली होती. सायंकाळी घरातील सगळे जेवण करून झोपले असता रात्री दोन वाजण्याच्या सुमारास ही बहिण घरातून बेपत्ता झाल्याचे निदर्शनास आले. बेपत्ता झालेल्या या बहिणेचे वय १७ वर्षे ८ महिन्यांचे असून ती अचानक गायब झाल्याचे पाहून एकच गोंधळ उडाला. सगळे झोपलेले असताना तिचे अचानक बेपत्ता होणे हे घरातील सगळ्यांसाठीच धक्कादायक होते. 


अखेर मुलीच्या आईने पंढरपूर तालुका पोलीस ठाण्यात याबाबत तक्रार दिली असून या मुलीला कुणीतरी फूस लावून पळवून नेले असल्याचे फिर्यादीत म्हटले आहे. सकाळी सदर घटनेबाबत गावातही माहिती झाली आणि गावातही खळबळ उडाली आहे. पंढरपूर तालुका पोलिसांनी याबाबत अज्ञात व्यक्तीविरोधात मुलीच्या अपहरणाचा गुन्हा दाखल केला असून पोलीस आता या आरोपीचा आणि मुलीचा शोध घेत आहेत. 


वाचा : पंढरीत पुन्हा एकदा लाखोंची चोरी !

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

आपल्या प्रतीसादाबद्धल धन्यवाद !