मुंबई : कोरोनाच्या तिसऱ्या लाटेच्या पार्श्वभूमीवर केंद्र सरकारने कोरोना निर्बंध आणि मार्गदर्शक तत्व अमलबजावणी करण्याची मुदत वाढवली असून आता ती २८ फेब्रुवारीपर्यंत करण्यात आली आहे.
कोरोनाची तिसरी लाट आणि ओमीक्रॉनच्या पार्श्वभूमीवर केंद्र आणि राज्य सरकार अधिक सतर्क झाले असून केंद्राकडून राज्याला सतत सूचना आणि मार्गदर्शक सूचना दिल्या जात आहेत. कोरोनाच्या संबंधित असलेल्या मार्गदर्शक तत्त्वांचे मुदत २८ फेब्रुवारीपर्यंत वाढवली आहे. नियमांबाबत कोणत्याही प्रकारचा हलगर्जीपणा न करण्याबाबत केंद्रशासित प्रदेश आणि राज्यांना केंद्र सरकारने पुन्हा सूचना दिल्या आहेत. कोरोनाचे नवीन प्रकार, ओमीक्रॉन यामुळे देशात कोरोनाच्या रुग्णात वाढ झाली आहे. कोरोनाचे रुग्ण वेगाने बरे होत आहेत, रुग्णालयात कोरोनाचे रुग्ण कमी असले तरीही रुग्णवाढीचा दर अधिक आहे ही चिंतेची बाब असल्याचे गृह सचिव अजय भल्ला यांनी राज्य आणि केंद्रशासित प्रदेशांना लिहिलेल्या पत्रात म्हटले आहे.
देशातील ३४ राज्य आणि केंद्रशासित प्रदेशातील ४०७ जिल्ह्यात १० टक्क्याहून अधिक सकारात्मकता दर आहे त्यामुळे कोरोनाचा संसर्ग पाहता सावधगिरी बाळगण्याची आणि दक्षता घेण्याची गरज आहे. खबरदारीच्या नियमांचे पालन सर्व केंद्रशासित प्रदेश आणि राज्यांनी करावे तसेच कुठल्याही परिस्थितीत निष्काळजीपणा दिला जाऊ नये असे आदेश देण्यात आले आहेत. कोरोना संबंधित सर्व नियमांची काटेकोरपणे अंमलबजावणी करण्यात यावी, यात मास्क घालणे, सार्वजनिक ठिकाणी, मेळाव्यात सुरक्षित सामाजिक अंतर राखणे याचे पालन केले जावे. जनतेत निर्माण होत असलेलले गैरसमज दूर करण्यासाठी सतत माध्यमातून माहिती देत रहावी, कोरोनाबाबत दिलेल्या सर्व सूचनांचे काटेकोरपणे पालन करणे सुरूच ठेवण्यात यावे असे आदेश केंद्राने राज्यांना दिले आहेत
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा
आपल्या प्रतीसादाबद्धल धन्यवाद !