BREAKING

✪ ✪ ✪➤ ✪➤ ✪➤ . ✪ ✪➤ ✪➤ . ✪➤

२६ जाने, २०२२

विठ्ठल मंदिरात देव आणि देशभक्तीचा संगम !



पंढरपूर : पंढरीच्या विठ्ठल मंदिरात आज भारतीय प्रजासत्ताक दिनाच्या निमिताने देव आणि देशभक्तीचा अनोखा संगम पाहायला मिळत असून फुलांची तिरंगी आरास आज मंदिरात वेगळेच चैतन्य निर्माण करीत आहे. 


सण उत्सवाच्या निमित्ताने विठ्ठल मंदिरावर रोषणाई केली जाते आणि विठ्ठल रुक्मिणी मातेच्या गाभाऱ्यातही प्रसंगानुरूप सजावट करण्यात येते. यामुळे आधीच चैतन्याने भरून गेलेले विठ्ठल मंदिर अधिकच चैतन्यमय होत असते.  आज भारतीय प्रजासत्ताक दिन असल्याने विठ्ठल मंदिरात देव आणि देशभक्ती या दोन्हीचा सुरेखा संगम साकारण्यात आला आहे.  फुलांची तिरंगी आरास मंदिरात साकारण्यात आली आहे. या सजावटीने मंदिराचे स्वरूप अधिकच खुलून आले आहे. 



पुण्याचे सचिन चव्हाण,  संदीप पोकळे, राहुल पोकळे, संतोष पोकळे, भोलेश्वर पोकळे  विक्रम भूरूक यांच्या वतीने ही तिरंगी आरास साकार झाली आहे. सुमारे ३५ हजार रुपये खर्च करून त्यांनी ७५० किलो फुले उपलब्ध  करून  दिली आहेत. पंढरपूर येथील शिंदे ब्रदर्स साई डेकोरेटर्स यांनी आरास सजावटीचे काम केले असून विठ्ठल रुक्मिणी मंदिर समितीच्या संकेतस्थळावरूनही मंदिरातील ही तिरंगी आरास पाहता येत आहे. भाविकांच्या आणि देशभक्तांच्या डोळ्याचे पारणे फेडणारी ही आरास पाहून  भाविकातही समाधान व्यक्त होत आहे. 

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

आपल्या प्रतीसादाबद्धल धन्यवाद !