BREAKING

✪ ✪ ✪➤ ✪➤ ✪➤ . ✪ ✪➤ ✪➤ . ✪➤

१६ जाने, २०२२

सोलापूरजवळ अपघातात तिघे जण जागीच ठार !

 



सोलापूर :सोलापूरजवळ झालेल्या भीषण अपघातात सोलापूर येथील तिघेजण ठार झाले आहेत. सोलापूर जिल्ह्यातील अपघाताची सुरु झालेली मालिका थांबायला तयार नाही हे आजच्या अपघाताने पुन्हा एकदा दिसून आले. 


काही दिवसांपूर्वीच सोलापूर - विजयपूर महामार्गावर एक भीषण अपघात झाला होता आणि त्यानंतर आज लगेचच दुसरा अपघात झाल्याची घटना समोर आली आहे. आज पाहते पावणे चार वाजण्याच्या सुमारास हा अपघात झाला आहे आणि यात सोलापूर येथील तिघांचा मृत्यू झाला आहे तर एक जण गंभीर जखमी झाला आहे. सोलापूर - विजयपूर मार्गावर तेरा मैल परिसरात अपघाताची ही भीषण घटना घडली आहे. स्कर्पिओ (एम एच १३ झेड ९९०९) ही गाडी सोलापूरकडे येत असताना पहाटेच्या वेळेस ती झाडाला धडकली. या गाडीतून सोलापुरातील तिघे औराद येथून सोलापूरकडे येत होते. पहाटेच्या वेळेस तेरा मैल परिसरातील वकील वस्ती येथील झाडाला या गाडीने जोरात धडक दिली त्यामुळे गाडीतील तिघे जबर जखमी झाले. जखमींना तातडीने सोलापूर येथील शासकीय रुग्णालयात उपचारासाठी आणण्यात आले. डॉक्टरांनी त्यांची तपासणी केली असता त्यांचा आधीच मृत्यू झाल्याची माहिती डॉक्टरांनी दिली.   


या अपघातात सोलापूर येथील मोदी येथे राहणारे ४५ वर्षे वयाचे व्यंकटेश राम म्हेत्रे, सळई मारुती, उत्तर कसबा येथे राहणारे ४५ वर्षीय किशोर अण्णाराव भोसले आणि  निराळे वस्ती येथे राहणारे ३२ वर्षे वयाचे नितीन भगवान भांगे या तिघांचा मृत्यू झाला आहे.  या अपघातात राकेश हुच्चे हे गंभीर जखमी आहेत. 



कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

आपल्या प्रतीसादाबद्धल धन्यवाद !