BREAKING

✪ ✪ ✪➤ ✪➤ ✪➤ . ✪ ✪➤ ✪➤ . ✪➤

९ जाने, २०२२

कोरोना नियम न पाळल्यास होऊ शकते अटक !



मुंबई : शासनाने घालून दिलेले कोरोना प्रतिबंधात्मक नियम न पाळल्यास आता केवळ दंड नव्हे तर अटकही होऊ शकते शिवाय मार्गदर्शक सूचनांचा भंग केल्यास पन्नास हजार रुपयांचा दंडही भरावा लागणार आहे.


राज्यात पुन्हा एकदा कोरोनाने आक्रमण केले असून प्रचंड वेगाने रुग्णसंख्या वाढत आहे. शासनाकडून नवे निर्बंध लागू केले जाण्याचे संकेत मिळत होते आणि अखेर शासनाने लागू केलेले निर्बंध आज मध्यरात्रीपासून अमलात येत आहेत. दिवसा जमावबंदी आणि रात्री संचारबंदी लागू करण्यात आली असून अन्य निर्बधही लावण्यात आले आहेत. विविध प्रकरच्या मार्गदर्शक सूचना शासनाने दिल्या असून त्याप्रमाणे अमल करणे प्रत्येक नागरिकावर बंधनकारक आहे. नियम न पाळणाऱ्या व्यक्तीला दंड ठोठावला जाणार आहेच पण यावेळी तेवढ्यावरच भाणार नाही. एखादी व्यक्ती वारंवार नियमांचा भंग करीत असेल तर त्याला कायद्यानुसार अटक देखील केली जाऊ शकते.

 

मास्क वापरणे बंधनकारक करण्यात आले असून कुठल्याही सार्वजनिक ठिकाणी आणि प्रवासात देखील मास्क बंधनकारक आहे. मास्क वापरला नसेल तर पाचशे रुपये दंड आकाराला जाईल, खाजगी वाहनातून प्रवास करताना गाडीत एकाच कुटुंबातील व्यक्त नसतील तर मास्क आवश्यक करण्यात आला आहे . शासनाने घोषित केलेल्या नव्या नियमानुसार एखाद्या आस्थापनेत अथवा संस्थेत नियमाचा भंग केल्यास व्यक्तिगत दंड भरावा लागणार आहेच पण आस्थापनेला अथवा त्या संस्थेला तब्बल १० हजार रुपयांचा दंड केला जाणार आहे. संस्था, आस्थापना यांच्याकडून मार्गदर्शक सूचनांचा भंग झाला तर ५० हजारांच्या दंडाची आकारणी केली जाईल. वाहनातून प्रवास करताना नियमभंग केल्यास त्या व्यक्तीसह वाहन चालक आणि कंडक्टर यांना पाचशे रुपयांचा दंड केला जाणार आहे.


      

 कोरोनाला अटकाव करण्यासाठी या मार्गदर्शक सूचना आणि नियमावली असून नागरिकांच्या हितासाठीच त्यांची अमलबजावणी होत आहे त्यामुळे नागरिकांनी स्वत:च काळजी घेतली तर कोरोनापासून बचाव तर होईलच पण त्याचा प्रसारही रोखला जाईल. गेल्या दोन वर्षांपासून शासन नियमावली तयार करते, प्रशासन ती राबविते पण अनेक नागरिक मात्र अजूनही गंभीर दिसत नसून अकारण गर्दी केली जाते तसेच कोरोना प्रतिबंधांच्या नियमाकडे सरळ दुर्लक्ष केले जाते. अशा बेफिकीर वर्तनामुळे कोरोनाच प्रसार होत असून दुसऱ्या लाटेत मोठा तडाखा बसला आहे. प्रचंड नुकसान होऊनही अजूनही काही नागरिकांनी कोरोनाला गंभीरपणे घेतलेले दिसत नाहीत. त्यांची बेफिकिरी इतरांच्या जीवावर उठते परंतु यांना मात्र त्याचे काहीही सोयरसुतक नसते. अशा बेपर्वा नागरिकांवर अधिकाधिक कठोर कारवाई होणे आवश्यक बनले आहे. 

 




कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

आपल्या प्रतीसादाबद्धल धन्यवाद !