BREAKING

✪ ✪ ✪➤ ✪➤ ✪➤ . ✪ ✪➤ ✪➤ . ✪➤

९ जाने, २०२२

ट्रॅक्टर अंगावरून गेल्याने पिता पुत्राचा जागीच मृत्यू !




मोहोळ : ट्रॅक्टरच्या वाहतुकीने आणखी एक अपघात केला असून मोहोळ तालुक्यात दुचाकीवरून निघालेल्या पिता पुत्रांचा मृत्यू झाला आहे.

 

साखर कारखान्याचे गळीत हंगाम सुरु झाल्यापासून पुन्हा एकदा ट्रॅक्टर वाहतूक बेलगाम झालेली असून रस्त्यावरील निरपराध लोकांचे जीव घेत हे ट्रॅक्टर धावत आहेत. गेल्या काही महिन्यात ट्रॅक्टरमुळे झालेल्या अपघातात प्रचंड वाढ झाली असून प्रत्येक तालुक्यात ट्रॅक्टरमुळे अपघात होत आहेत. अत्यंत बेशिस्त असलेल्या ट्रॅक्टर वाहतुकीवर कुणाचेच नियंत्रण नाही हे पुन्हा एकदा दिसून आले आहे. कर्णकर्कश आवाजातील गाणी वाजवत वाहतुकीचे सगळे नियम टायरखाली तुडवत हे ट्रॅक्टर रस्त्यावरून धावत असतात आणि त्यांना वेसण घालणारे कुणी नसल्यामुळे नागरिकांचे जीव जात आहेत. मोहोळ तालुक्यात अंजनगाव रस्त्यावर झालेल्या ट्रॅक्टर अपघातात दुचाकीवरून निघालेल्या पितापुत्रांना आपला जीव गमवावा लागला आहे.

 

दुचाकीवर निघालेले ४५ वर्षे वयाचे संजय ज्ञानदेव गडेकर आणि राहुल संजय गडेकर हा त्यांचा १५ वर्षे वयाचा मुलगा या अपघातात मृत्युमुखी पडले आहेत.  सदर पिता पुत्र आपले काम आटोपून अनगरवरून मोटार सायकलवरून अंजनगावकडे निघाले असताना समोरून येत असलेल्या दुसऱ्या एका दुचाकीने त्यांना जोरदार धडक दिली त्यामुळे ते खाली पडले. पाठीमागून वेगात येत  असलेल्या ट्रॅक्टरने खाली पडलेल्या या दोघांनाच चिरडले. दोघांच्या अंगावरून ट्रॅक्टर गेल्याने या पिता पुत्रांचा जागीच मृत्यू झाला आहे. 

      


कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

आपल्या प्रतीसादाबद्धल धन्यवाद !