BREAKING

✪ ✪ ✪➤ ✪➤ ✪➤ . ✪ ✪➤ ✪➤ . ✪➤

६ जाने, २०२२

आरोग्य विभागालाच कोरोना ! दोनशे तीस डॉक्टर झाले कोरोनाबाधित !

 





मुंबई : महाराष्ट्रात कोरोनाचा उद्रेक होऊ लागला असतानाच मुंबईत तीन दिवसात २३० डॉक्टरांना कोरोनाची बाधा झाल्याचे समोर आल्याने अधिकच चिंतेचे वातावरण बनले आहे. 


नव्या वर्षात कोरोना सुसाट सुटला असून संपूर्ण देशात पुन्हा उद्रेकाची परिस्थितीत निर्माण झाली आहे. मोठ्या शहरापासून आता छोट्या शहरापर्यंत आणि गावपातळीपर्यंत कोरोना रुग्णांच्या संख्येत रोज वाढ होऊ लागली असून आता धोका वाढत चालल्याचे स्पष्ट झाले आहे. कोरोना वाढीचा वेग महाराष्ट्रात आणि विशेषत: मुंबई, पुण्यासारख्या शहरात अधिक आहे. ही वाढ वाड्या वस्त्यांपर्यंत पोहोचण्यास उशीर लागणार नाही. मुंबईत तर काल एका दिवसात १५ हजाराहून अधिक नवे रुग्ण आढळले आहेत आणि वाढीचा हा प्रवास ग्रामीण भागापर्यंत पोहोचू लागला आहे 


कोरोनाचा वेग पाहता राज्य शासनाने पूर्ण तयारी केली आहे आणि आरोग्य विभागाला पूर्णपणे सतर्क करण्यात आले आहे तथापि आरोग्य विभागच कोरोनाबाधित होऊ लागला आहे. मुंबईतील जवळपास २३० निवासी डॉक्टर कोरोनाबाधित झाले आहेत. या डॉक्टरांचा कोरोना अहवाल पॉझिटिव्ह आले असल्याची माहिती महाराष्ट्र असोसिएशन ऑफ रेसिडेंट डॉक्टर्स, जे जे रुग्णालयाचे अध्यक्ष गणेश सोळुंकी यांनी दिली आहे.  एकीकडे कोरोनाचा वेग वाढत असताना दुसरीकडे आरोग्य विभागाचं बाधित झाला तर हे नवे संकट ठरणार आहे. 



राज्यात देखील कोरोना झपाट्याने वाढू लागला असून काल बुधवारी राज्यभरात २६ हजार ५३८ नवे रुग्ण आढळून आले आहेत आणि ८ रुग्णांचा कोरोनामुळे मृत्यूही झाला आहे. दिलासादायक बाब म्हणजे ५ हजार ३३१ रुग्ण कोरोनमुक्तही झाले आहेत.  महाराष्ट्रात सक्रिय रुग्णांची संख्या आता ८७ हजार ५०५, म्हणजे एक लाखाच्या जवळ पोहोचू लागली आहे. त्यातच ओमीक्रॉनचा संसर्ग वेगाने वाढत आहे.  ओमीक्रॉन चे सर्वाधिक रुग्ण महाराष्ट्रात असून काल पुन्हा १४४ नवे रुग्ण आढळून आले आहेत त्यामुळे राज्यात आत्तापर्यंत ओमीक्रॉनचे ७९७ रुग्ण झाले आहेत. ओमीक्रॉनच्या ३३० रुग्णांना उपचार करून घरी सोडण्यात आले आहे. 


मुंबईत सर्वाधिक उद्रेक पाहायला मिळू लागला आहे. काल बुधवारी एकाच दिवशी मुंबईत १५ हजार १६६ नवे रुग्ण आढळून आले आहेत तर आदल्याच दिवशी मंगळवारी १० हजार ८६० रुग्णांची नोंद झाली होती.  केवळ एका दिवसात ५ हजार रुग्ण वाढले आहेत. एकट्या मुंबईत कोरोनाचे ६१ हजार ९२३ सक्रिय रुग्ण आहेत तर ७१४ रुग्णांना उपचार करून घरी सोडले आहे. मुंबई आणि राज्यात कोरोनाचे रुग्ण रोज वाढत आहेत पण या वाढीची संख्याही धक्कादायक ठरू लागली आहे.  


   

   

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

आपल्या प्रतीसादाबद्धल धन्यवाद !