पंढरपूर : पंढरपूर येथे आज एका तरुणाने गळफास घेऊन आपले जीवन संपवले असून ही आत्महत्या सावकाराच्या विळख्यामुळे झाली असल्याची चर्चा सुरू झाली आहे.
पंढरपूर येथील संतोष साळुंखे या एका २५ वर्षीय तरुणाने गळफास घेऊन आत्महत्या केल्याचे आज समोर आले आहे. ही आत्महत्या नेमकी कशामुळे केली आहे हे स्पष्ट झाले नसले तरी बेकायदा सावकारीचा हा बळी असल्याची चर्चा होत असून पोलीस तपासात सत्य निष्पन्न होईल. पोलिसांनी पंचनामा करून मृतदेह शवचिकित्सेसाठी उप जिहा रुग्णालयाकडे पाठविण्यात आला आहे.
पंढरपूर शहरात अवैध सावकारीची नेहमीच चर्चा सुरु असते आणि हा बेकायदा व्यवसाय मोठ्या प्रमाणात चालत असतो. सावकारांचे व्याज भरण्यात अनेकांची हयात जाते पण कर्ज काही फिटत नाही. पैशासाठी सावकार सतत तगडा लावत असतात त्यामुळे या तगाद्याला वैतागून आत्महत्येसारख्या घटना घडण्याचीही शक्यता असते. संतोष साळुंखे या तरुणाची आत्महत्या कशासाठी आहे याची उकल झाली नसली तरी पोलीस तपासात सत्य बाहेर येईल. तरुणाच्या आत्महत्येने मात्र अनिल नगर परिसरात हळहळ व्यक्त करण्यात येत आहे.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा
आपल्या प्रतीसादाबद्धल धन्यवाद !