BREAKING

✪ ✪ ✪➤ ✪➤ ✪➤ . ✪ ✪➤ ✪➤ . ✪➤

४ डिसें, २०२१

अल्पवयीन मुलीवर बलात्कार प्रकरणी पाळीव कुत्र्याला अटक !

 

प्रातिनिधिक छायाचित्र 


मेक्सिको : कुठलाही गुन्हा केला तर माणसाला अटक होते पण एका अल्पवयीन मुलीवर बलात्कार केल्याप्रकरणी चक्क एका कुत्र्याला अटक करण्याची घटना मेक्सिकोत घडली आहे. 


जगात सगळीकडेच अत्याचार, बलात्कार अशा घटना घडतात आणि यात अल्पवयीन मुलासह वृद्धापर्यंत अटक झालेल्या आपल्या माहितीत येत असते पण अल्पवयीन मुलीवर केलेल्या बलात्कार प्रकरणात चक्क एका कुत्र्याला आरोपी करण्यात आले असून पोलिसांनी त्या कुत्र्याला अटकही केले आहे. विशेष म्हणजे हा कुत्रा पाळीव आहे आणि त्याने या मुलीवर बलात्कार केल्याचा आरोप करण्यात आला आहे. या घटनेने पोलिसासह सगळेच चक्रावून गेले आहेत. 


उत्तर अमेरिकेतील मेक्सिको शहराच्या तल्हाहआक परिसरात एक वेगळीच आणि अविश्वसनीय घटना समोर आली आहे. आपल्या मुलीवर पाळीव असलेल्या कुत्र्याने बलात्कार केला असल्याची तक्रार मुलीच्या आईने पोलिसात केली आहे. सदर अल्पवयीन मुलीला घेवून तिची आई थेट पोलीस ठाण्यात दाखल झाली आणि तिने आपल्या घरात पळालेल्या कुत्र्यावर आरोप करून पोलिसात तक्रार केली आहे. ही घटना जगभर चर्चेत आली असून भले भले चक्रावून गेले आहेत. 


पिडीत मुलीच्या आईच्या तक्रारीवरून पोलिसांनी गुन्हा दाखल करून घेत सदर कुत्र्याला अटक केली आहे आणि पुढील तपास सुरु केला आहे. पिडीतेच्या आईचा आरोप पोलिसांना पटत नसून त्यांना या घटनेत संशय येत आहे. पिडीत मुलगी आणि पाळीव कुत्रा हे दोघेच एका खोलीत होते आणि त्याचवेळी या कुत्र्याने तिच्यावर बलात्कार केल्याचे आईचे म्हणणे आहे पण पोलिसांना मात्र याबाबत संशय आहे. सदर महिलेच्या सांगण्यावर विश्वास ठेवणे कठीण असल्याचे पोलिसांचे म्हणणे आहे त्यातच पोलिसांनी पिडीत मुलीच्या सावत्र वडिलास देखील अटक करून तपास सुरु केला आहे. आपल्या पतीला वाचविण्यासाठी सदर महिला कुत्र्यावर आरोप करीत असावी असे पोलिसांना वाटत आहे.  


पिडीत मुलगी ही अवघ्या नऊ वर्षे वयाची असून तिला उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. सदर प्रकरणी पोलिसांना वैद्यकीय अहवालाची प्रतीक्षा असून हा अहवाल आल्यानंतर सत्य समोर येणारच आहे. तोपर्यंत मात्र पोलिसांनी घराच्या पाळीव कुत्र्यालाही अटक केली आहे. ही घटना कुणालाही पटत नसून यात पिडीत मुलीच्या आईचे काही कारस्थान नक्कीच असावे असा संशय व्यक्त केला जात आहे. पोलिसांनी मात्र अत्यंत सावध तपास सुरु केला असून पिडीत मुलीच्या सावत्र पित्यास अटक करून त्या दिशेने तपास सुरु करण्यात आला आहे. या घटनेचे वृत्त जगभरात प्रसिद्ध होत असून पिडीत मुलीच्या आईवर विश्वास ठेवायला कुणीही तयार नसल्याचे दिसत आहे.  


1 टिप्पणी:

आपल्या प्रतीसादाबद्धल धन्यवाद !