पंढरपूर : सासऱ्याने आपल्याच सुनेच्या स्नानाची चित्रफित तयार करून तिला ब्लोक्मेल केल्याची मोठी घटना पंढरपूर तालुक्यात घडली असून याप्रकरणी पिडीतेने तक्रार दिल्यानंतर पंढरपूर ग्रामीण पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
महिला घराबाहेर पडल्यावर सुरक्षित नाहीत पण आता त्या घरातही सुरक्षित नाहीत असेच चित्र समोर आले आहे. सासरा म्हणजे वडिलाचेच दुसरे रूप असते पण तो देखील नराधम बनून घरातच नागोबा बनल्याचे समोर आले आहे. दोन आठवड्यापूर्वी या नराधम सासऱ्याने घरात कोणी नसल्याचा गैरफायदा उठवला आणि सुनेच्या अंगावर हात टाकला. तिच्यावर बळजबरी करू लागला पण सुनेने आरडाओरडा केल्यानंतर त्याने तिला सोडून दिले. घडलेला प्रकार सुनेने आपल्या पतीला सांगितला पण पतीने तिची समजूत घालून शांत केले होते.
घडल्या प्रकारानंतर काहीच झाले नाही यामुळे साहजिकच त्याचे मनोधैर्य वाढले आणि त्याने पुढचे पाउल टाकले. त्यानंतर सदर विवाहिता आपल्या घरासमोर असलेल्या स्नानगृहात स्नान करीत असताना नकळत या नराधमाने तिचे चित्रीकरण केले आणि त्याद्वारे तो तिला ब्लॅकमेल करू लागला. 'माझ्या मुलापासून तुला मुलबाळ होणार नाही त्यामुळे तू माझ्याशी संबंध ठेव, अन्यथा स्नान करताना केलेले चित्रीकरण व्हायरल करीन' अशी धमकी या सासरा हे नाते असलेल्या नराधमाने केली. त्यानंतर पीडितेने फोन करण्याच्या बहाण्याने तिने सासऱ्याकडून मोबाईल घेतला आणि त्यातील सदर चित्रीकरण पाहून खात्री करून घेतली. नंतर या पीडितेने ते आपल्या भावाच्या मोबाईलवर पाठवून दिला.
त्यानंतरही सासरा पीडितेला ब्लॅकमेल करीत राहिला आणि तिला ते चित्रीकरण दाखवत लज्जा उत्पन्न होईल असे वर्तन करीत राहिला. अखेर न राहवून पीडितेने आपल्या माहेरी मंगळवेढा येथे जाण्याचा निर्णय घेतला. मोहरी जाऊन तिने आपल्या आई वडिलांना हा प्रकार सांगितला. त्यानंतर आज तिच्या माहेरच्या माणसासोबत येऊन पीडितेने पंढरपूर ग्रामीण पोलीस ठाण्यात सासऱ्याविरोधात तक्रार दिली. या तक्रारीवरून पोलिसांनी नराधम सासऱ्याविरोधात गुन्हा दाखल केला आहे. गुन्हा दाखल झाल्यानंतर पोलिसांनी नराधमास ताब्यात घेतले आहे. विवाहित महिला आपल्या घरातही सुरक्षित नाही आणि वडिलासमान नाते असलेला घरातील व्यक्तीच नराधम बनून समोर उभा राहिला तर महिला कशा सुरक्षित राहतील हाच सवाल या घटनेने उपस्थित झाला आहे.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा
आपल्या प्रतीसादाबद्धल धन्यवाद !