BREAKING

✪ ✪ ✪➤ ✪➤ ✪➤ . ✪ ✪➤ ✪➤ . ✪➤

२३ नोव्हें, २०२१

सोलापूर रस्त्यावर अपघात, सहाय्यक फौजदार पती पत्नी ठार !

 


मोहोळ : मोहोळ - सोलापूर मार्गावर आज झालेल्या अपघातात मोहोळ तालुक्यातील कोंबडवाडी येथील निवृत्त सहाय्यक फौजदार पती पत्नीं ठार झाले आहेत. मोटारसायकलला ट्रकने पाठीमागून उडविल्याने हा अपघात झाला आहे. 


मुळ मोहोळ तालुक्यातील कोंबडवाडी येथील रहिवाशी असलेले अर्जुन नामदेव थिटे (वय ६५ ) आणि त्यांची पत्नी अनिता अर्जुन थिटे (वय ६० ) हे सोलापूर येथे एस आर पी कँम्प येथे राहतात. आज ते मोहोळ तालुक्यातील आपल्या मूळ गावी घरगुती कार्यक्रम उरकून मोटार सायकलवरून परत सोलापूर येथे निघाले होते. त्यांची दुचाकी वडवळ पुलावरून पुढे कोळेगाव हद्दीत आली असता पाठीमागून भरधाव वेगाने येणाऱ्या एक ट्रकने ( एमपी ३९ व्ही ६८२९) त्यांना मागून धडक देत उडवले आणि या अपघातात दोघे पती पत्नी जागीच ठार झाले. 

या अपघातात मयत झालेले अर्जुन थिटे हे एसआरपी मध्ये सेवेस होते. सहाय्यक फौजदार पदावरून ते निवृत्त झाले होते आणि सोलापूर एसआरपी कॅम्प येथे राहत होते.  राष्ट्रपती पदक देऊन थिटे यांचा सन्मान करण्यात आला होता. त्यांचा आणि त्यांच्या पत्नीचा अपघातात मृत्यू झाल्याचे समजताच नागरिकांनी मोहोळ येथील ग्रामीण रुग्णालयात प्रचंड गर्दी केली होती. एकाच अपघातात पती पत्नीचा मृत्यू झाल्याने मोहोळ तालुक्यातून हळहळ व्यक्त करण्यात येत असून सोलापूर एसआरपी कॅम्प परिसरातही शोक व्यक्त करण्यात येत आहे. सदर अपघाताची नोंद मोहोळ पोलीस ठाण्यात करण्यात आली आहे.     

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

आपल्या प्रतीसादाबद्धल धन्यवाद !