BREAKING

✪ ✪ ✪➤ ✪➤ ✪➤ . ✪ ✪➤ ✪➤ . ✪➤

२९ ऑक्टो, २०२१

दारूचा ट्रक पलटी होताच माणुसकीचा खून झाला !

 




बारामती : दारूचे बॉक्स घेऊन निघालेला ट्रक पालथा झाला आणि माणुसकीचा खून झाल्याचे दर्शन पुन्हा एकदा झाले. चालकाला मदत करण्याऐवजी बाटल्या पळविणाऱ्या गिधाडांची झुंबड उडाली. 

माणूस माणसांच्या मदतीला धावल्याच्या अनेक घटना समोर येत असतात पण त्यातूनच माणसांमधली माणुसकी मेली असल्याचेही अनेकदा पाहायला मिळते. रस्त्यावर अपघात झाल्यानंतर जखमींना वैद्यकीय मदत पोहोचविण्याऐवजी मोबाईल काढून त्याची छायाचित्रे घेण्यात आणि  चित्रीकरण करण्यात धन्यता मानणारे अनेकजण याच समाजात दिसतात. तसे एखाद्या ट्रकचा अपघात झाला की ट्रकमधील साहित्य लुटण्यासाठी झुंबड उडते. आज त्यापेक्षाही वाईट प्रकार समोर आला आहे. 

बारामती तालुक्यात उंडवडी कडेपठार भागात दारूचे बॉक्स घेऊन जाणारा एक ट्रक उलटला आणि तळीराम मंडळी धावत सुटली. ६५ लाख रुपये किमतीची दारू असलेले ९५० बॉक्स या ट्रकमध्ये होते.  ट्रक उलटल्याने दारूचे बॉक्स आणि बाटल्या विखरून खाली पडल्या. ट्रक उलटल्याची बातमी कानावर येताच तळीरामांचे पाय या भागाकडे अत्यंत वेगाने धावले आणि जमेल तेवढे बॉक्स उचलून पळवून नेणे सुरु झाले. 

पिंपळी येथील एका कंपनीतून निघालेला हा ट्रक जळगावकडे निघालेला होता पण चालकाला झोप लागल्याने हा ट्रक उलटला आणि तळीरामाचे फावले.  दारू लुटण्यासाठी झुंडीच्या झुंडी येऊ लागल्या. चालक निलेश गोसावी आणि क्लिनर अंकुश बेंद्रे हे या अपघातातून बचावले असले तरी त्यांना मार लागलेला होता. एकानेही त्यांना उपचार अथवा वैद्यकीय मदतीची विचारणा केली नाही. पिशव्या भरून, दुचाकीवर टाकून जमेल तेवढे बॉक्स पळविण्याचा नादात जो तो होता. चालक आणि क्लिनर यांनी त्यांना प्रतिबंध करताच त्यांना चक्क मारहाण करण्यात आली आणि ट्रकची ताडपत्री कापून पोत्या पोत्यात भरून दारूचे बॉक्स लोकांनी पळवले. 

या अपघातात चालक आणि क्लिनर याना काही मार लागला आहे काय ? हे देखील कोणी पहिले नाही. उलटलेल्या ट्रकच्या खाली माणुसकीही निपचित पडलेली दिसून आली. जेंव्हा पोलीस पोहोचले तेंव्हा कुठे लोकांची हातातील बाटल्या आणि बॉक्स खाली टाकून पळ काढला !   











   


कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

आपल्या प्रतीसादाबद्धल धन्यवाद !