BREAKING

✪ ✪ ✪➤ ✪➤ ✪➤ . ✪ ✪➤ ✪➤ . ✪➤

२५ ऑक्टो, २०२१

एस. टी. अपघात, बसचा झाला चक्काचूर !


बसचा 
चक्काचूर !


सोलापूर : राज्य परिवहन महामंडळाच्या बसला झालेल्या जबरदस्त अपघातात बसचा चक्काचूर झाला असून वाहकांसह पंधरा प्रवासी जखमी झाले आहेत.

पुणे - उमरगा ही राज्य परिवहन महामंडळाची एस टी बस रात्री पुण्याहून उमरगाकडे जात होती. चिखली गावाजवळ आल्यानंतर रस्त्याच्या कडेला थांबलेला कंटेनर बस चालकाला दिसला नाही त्यामुळे पहाटेच्या सुमारास एस टी बस सरळ जाऊन या कंटेनरला धडकली. बस वेगात असल्याने आणि कंटेनर एका जागी उभा असल्याने अत्यंत जोराने एस टी उभ्या कंटेनरवर आदळली. 

प्राप्त माहितीनुसार या अपघातात जवळपास पंधरा प्रवाशी जखमी झाले असून यात बसचे वाहक कांबळे यांचाही समावेश आहे. अपघातात बसचा अक्षरशः चक्काचूर झाला आहे. एस टी बसचे मूळ स्वरूप नष्ट झाले असून अपघातग्रस्त बस पाहून अनेकांना धक्का बसत आहे आणि अपघात किती भयानक असावा याचा अंदाज येत आहे. पहाटेच्या सुमारास झालेल्या या अपघाताची माहिती राष्ट्रीय महामार्ग पोलिसांना मिळताच त्यांनी तातडीने धाव घेतली आणि जखमींना उपचारासाठी रुग्णालयात पाठवले. 

राज्यात बहुतेक रस्ते रुंद आणि सिमेंटचे बनविण्यात येत आहेत. रस्त्याचे काम प्रदीर्घ काळ चालू राहते आणि अनेकदा अर्धवट काम तसेच कित्येक महिने ठेवले जाते. अशा प्रकारामुळे अनेकदा अपघात झाले आहेत. ठेकेदाराच्या दुर्लक्षामुळे अपघाताचे प्रमाण वाढले आहे. अचानक मध्येच रस्ता संपतो अथवा खोडून ठेवलेला असतो. वेगात येणाऱ्या वाहनांना ते दिसत नाही आणि अचानकपणे समोर दिसल्यावर वाहनाला ब्रेक लागेपर्यंत अपघात झालेला असतो. अशा प्रकारचे अपघात रस्त्यावर सगळीकडेच झालेले आहेत आणि अजूनही होत आहेत. 

कुणाच्यातरी बेपर्वाईमुळे निरपराध लोकांचे जीव जात आहेत पण त्यांच्या जीवाची पर्वा ठेकेदारांना अथवा संबंधित अधिकारऱ्या नसते. अपघात होऊन एखादा बळी गेल्यानंतर मात्र तातडीने उपाय योजना करण्यात येते. या प्रकाराकडे अधिक लक्ष देण्याची गरज निर्माण झाली आहे. राज्य परिवहन महामंडळाच्या बसमुळे अपघात होण्याचे प्रमाणही अलीकडे वाढताना दिसत आहे. सुरक्षित प्रवास म्हणून ढोल वाजविला जात असताना हाच प्रवास अधिक असुरक्षित वाटू लागला आहे. गेल्या काही महिन्यात राज्य परिवहन महामंडळाच्या बसचे अथवा बसमुळे अनेक अपघात झाले असून या अपघातात अनेकांचे प्राणही गेले आहेत. परिवहन महामंडळाने याबाबत अधिक सक्षम पावले उचलण्याची गरज आहे. 


कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

आपल्या प्रतीसादाबद्धल धन्यवाद !