BREAKING

✪ ✪ ✪➤ ✪➤ ✪➤ . ✪ ✪➤ ✪➤ . ✪➤

२५ ऑक्टो, २०२१

सणासुदीच्या दिवसांत चिंता वाढविणारी माहिती आली समोर !

 


चिंता !

मुंबई : कोरोनाचा प्रादुर्भाव कमी होत असल्याने दिलासा मिळत असतानाच महाराष्ट्रात कोरोनाचा एक नवा व्हेरीयंट आढळून आल्याने चिंता वाढली आहे. 

कोरोना म्हटलं की अंगावर काटा उभा राहतो एवढा विनाश गेल्या पावणे दोन वर्षात या कोरोनाने केला आहे. फिरणारी सगळी चक्र या कोरोनाने जागेवर थांबवली आणि गरिबापासून श्रीमंतापर्यंत सगळ्यांचाच जगणं कठीण केलं. अभूतपूर्व नुकसान करून हा कोरोना आता कुठे परतीच्या मार्गावर असल्याचे दिसत आहे. तिसऱ्या लाटेचं दडपण होतं पण  तेही आता धूसर झालं आणि जनजीवन हळू हळू पूर्वपदावर येत असताना राज्याची चिंता पुन्हा  वाढवणारी बातमी येऊन धडकली आहे. साहजिकच यामुळे चिंता वाढणार आहे.  

महाराष्ट्र राज्य आणि मध्य प्रदेशात कोरोनाचा नवा व्हेरिएंट आढळल्याने ही चिंता वाढली आहे. त्यामुळे पुन्हा एकदा भीतीदायक परिस्थिती निर्माण होऊ लागली आहे. कोरोनाचा नवा डेल्टा व्हेरिएंट AY 4.2 आढळून आल्याने एकच खळबळ माजली आहे. मध्य प्रदेशात ७ जणांना या नव्या व्हेरीएंटची लागण झाल्याची बातमी प्रसिद्ध झाल्याने खळबळ उडाली असतानाच महाराष्ट्रात जवळपास एक टक्के नमुन्यात हा व्हेरीएंट आढळला असल्याने राज्यातील चिंताही वाढली आहे.  ब्रिटनमध्ये या कोरोना विषाणुच्या प्रकाराने अक्षरश: थैमान घातलं आहे. तसेच या व्हेरिएंटचा प्रसार हा अधिक वेगाने होत असल्याचं तज्ज्ञांकडून सांगितलं जात आहे. ब्रिटनच्या आरोग्य यंत्रणेनं यापुर्वीच याबाबत माहिती दिली आहे. आधीपासूनच या व्हेरीएंटवर संशोधन सुरु होतं.

सद्या सणासुदीचे दिवस सुरु आहेत आणि कोरोना परतीच्या मार्गावर निघाल्याने जनमानसात समाधानाचे वातावरण आहे. सुटकेचा निश्वा:स टाकलेल्या जनतेच्या काळजात पुन्हा या नव्या माहितीमुळे धडकी भरणार आहे. कोरोनाने दुसऱ्या लाटेत मोठा विनाश केला असून अनेकांचे प्राण या कोरोनाने हिसकून नेले आहेत त्यामुळे आता पुन्हा या विषाणूचे नाव घेण्याचीही जनतेची मानसिकता नाही. त्यातच या नव्या माहितीने चिंता वाढली आहे. सणासुदीचे दिवस असल्याने नागरिकांनी काळजी घेण्याची गरज यामुळे अधिक वाढली आहे. 

गेल्या पावणे दोन वर्षात कोरोनाने प्रचंड नुकसान केले आहे. असंख्य कुटुंबाचे आधार गेले आहेत तर कित्येक बालकांचे पालक हरवले आहेत. कुटुंबच्या कुटुंब या कोरोनाने मृत्युच्या खाईत लोटले आहेत आणि बालकांना अनाथ केले आहे. संचारबंदी, वेगवेगळे निर्बंध यामुळे अर्थचक्र जागीच थांबले असून उद्योग व्यवसाय प्रचंड संकटात आलेले आहेत. गरीब आणि सामान्य परिस्थितीतील नागरिकांना रोजी रोटी मिळवणे कठीण झालेले होते. आता कुठे परिस्थिती बदलत आहे पण यातून सावरायला अजून बराच काळ जावा लागणार आहे. 

एक विषाणुमुले एवढी विदारक परिस्थिती निर्माण केलेली असली तरी अनेक लोक अजूनही कोरोनाला गांभीर्याने घेताना दिसत नाहीत. मास्क न लावता कोरोनाचा प्रसार करीत अनेक लोक बेफिकीरपणे फिरत असतात तर बाजारात मोठी गर्दी  करीत असतात. हे लोक कोरोनाचे वाहक ठरत आहेत. कोरोनाने अपरिमित हानी करूनही अनेक लोक मात्र बिनधास्त असून दुसऱ्याच्या जीवावर उठत आहेत. आता कोरोना परतीच्या मार्गावर असल्याने दिलासा मिळू लागला आहे त्यामुळे आणखी काही काळ काळजी घेण्याची गरज निर्माण झालेली आहे. संभाव्य तिसरी लाट येईल असे सांगितले जात होते पण आता ती शक्यता मावळली असल्याचे दिसत आहे. ही शक्यता दिसत नसली तरी धोका मात्र कायम आहे त्यामुळे आणखी काही काळ कोरोना प्रतिबंधाचे सगळे नियम काळजीपूर्वक पाळणे आवश्यक ठरणार आहे.  


कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

आपल्या प्रतीसादाबद्धल धन्यवाद !