BREAKING

✪ ✪ ✪➤ ✪➤ ✪➤ . ✪ ✪➤ ✪➤ . ✪➤

२१ डिसें, २०२३

सहल घेऊन गेलेल्या एस. टी.बसचा मोठा अपघात !


शोध न्यूज : शैक्षणिक सहल घेवून गेलेल्या राज्य परिवहन महामंडळाच्या बसचा सोलापूर जिल्ह्यात मोठा अपघात झाला असून या अपघातात शिक्षकाचा मृत्यू झाला आहे तर इतर विद्यार्थी आणि शिक्षक जखमी झाले आहेत.

अपघाताचे प्रमाण वाढलेले असतानाच राज्य परिवहन महामंडळाच्या बसचेही वेगवेगळ्या पद्धतीने अपघात होताना समोर येत आहेत.  'सुरक्षित प्रवास' अशी बिरुदावली मिरवत असलेल्या एस टी चे अपघात वाढत आहेत, त्यातच आज शैक्षणिक सहल घेवून गेलेल्या आणि सहल करून परत येत असलेल्या एस टी बसचा एक अपघात सोलापूर जिल्ह्यातील माळशिरस तालुक्यात घडला आहे. इंदापूर तालुक्यातून विद्यार्थ्यांची ही सहल गेली होती आणि ती परत येत असताना हा अपघात झाला आहे.  शैक्षणिक सहलीसाठी इंदापूर तालुक्यातील बावडा येथील शिवाजी विद्यालयातील विद्यार्थ्यांची एक शैक्षणिक सहल १९ डिसेंबर रोजी गणपती पुळे येथे गेली होती. या सहलीत चाळीस विद्यार्थी सहभागी झाले होते तर त्यांच्यासोबत २ शिक्षिका आणि दोन शिक्षक होते. गणपती पुळे येथे जाऊन ही सहल परत बावडा येथे येत असताना हा अपघात झाला.

राज्य परिवहन महामंडळाची बस घेवून विद्यार्थ्यांची ही सहल गेलेली होती आणि याच बसचा ((क्रमांक एस टी क्रमांक एम एच 14 बी टी 4701)) आणि एका टेम्पोची जोरदार धडक माळशिरस तालुक्यातील वटपळी येथे झाली. (Major accident Of student bus) आज गुरुवारी पहाटेच्या सुमारास हा अपघात झाला आणि या अपघातात एका शिक्षकाचा मृत्यू झाला असून काही विद्यार्थी जखमी झाले आहेत, या जखमीत अन्य शिक्षकांचा देखील समावेश आहे. या जखमींना अकलूज येथील रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे.  




कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

आपल्या प्रतीसादाबद्धल धन्यवाद !